माहिती अधिकारांतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ
By Admin | Updated: May 14, 2014 22:35 IST2014-05-14T22:19:58+5:302014-05-14T22:35:47+5:30
शिरपूर ग्रामपंचायत प्रशासनाने माहिती अधिकारांतर्गत मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप

माहिती अधिकारांतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ
वाशिम : शिरपूर ग्रामपंचायत प्रशासनाने माहिती अधिकारांतर्गत मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते पप्पू घुगे यांनी निवेदनाद्वारे केला आहे. शिरपूर ग्रामपंचायतमध्ये विविध फंडातून किती निधी आला, कोणत्या बाबींवर खर्च करण्यात आला, त्याबाबतची बिले, ग्रामसभा कधी घेतल्या आणि किती जणांची उपस्थिती होती, ग्रामसभेत कोणत्या कामांवर चर्चा झाली, कोणते काम मंजूर झाले आदीबाबत पप्पू घुगे यांनी माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली होती. मात्र, दीर्घ मुदतीनंतरही योग्य माहिती दिली. गटविकास अधिकार्यांनी सुनावणी घेतली. यावेळी घुगे आणि ग्रामविकास अधिकार्यांची उपस्थिती होती. यावेळी माहिती न दिल्यास ग्रामविकास अधिकार्यांवर काही दिवस विनावेतनची कारवाई करण्याचा इशारा गटविकास अधिकारी संदीप पवार यांनी दिला होता. मात्र, विहित मुदतीतही माहिती दिली नाही, असे घुगे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. कामकाजात पारदर्शकता असेल तर माहिती देण्यात अडचण काय? असा सवालही घुगे यांनी उपस्थित केला आहे. माहिती अधिकाराच्या कायद्याला पायदळी तुडविणार्या अधिकार्यांविरूद्ध कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते पप्पू घुगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.