चार ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी ८५ टक्के मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 18:26 IST2022-09-18T18:24:14+5:302022-09-18T18:26:25+5:30
सोमवारी सकाळी १० वाजतापासून कारंजा येथील तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

चार ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी ८५ टक्के मतदान
प्रफुल बानगावकर
कारंजा लाड - कारंजा तालुक्यातील काजळेश्वर, धनज, वाई व किन्ही रोकडे या चार ग्रा. पं. ची मुदत संपल्याने, रविवारी (दि.१८) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत सरासरी ८५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी सकाळी १० वाजतापासून कारंजा येथील तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीसाठी उपरोक्त चार गावांत ३७२५ पुरूष व ४३८० महिला असे एकूण ८१०५ मतदार आहेत. तर चार सरपंच पदासाठी १४ व ३८ सदस्य पदांसाठी ७५ असे एकूण ८९ उमेदवारांनी निवडणुक रिंगणात आपले नशीब आजमावले आहे. निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कारंजा ग्रामीण व धनज पेालिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याचे तर तहसीलदार धिरज मांजरे व निवडणूक नायब तहसीलदार विनोद हरणे यांनी मतदान केंद्रावर भेटी देउन परिस्थितीचा आढावा घेतल्याचेही यावेळी दिसून आले. या निवडणुकीत सरपंच थेट जनतेतून निवडून येणार असल्याने मतदारात एक अभूतपुर्व उत्साह देखील पाहावयास मिळाला. सरासरी ८५ टक्के मतदान झाले असून, सोमवार १९ सप्टेंबर रोजी कारंजा येथील तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.