शेलूवाडा पुलावर ऑटो अपघात, पाण्यात पडून एकाचा मृत्यू

By नंदकिशोर नारे | Published: August 21, 2023 01:49 PM2023-08-21T13:49:38+5:302023-08-21T13:49:52+5:30

२१ ऑगस्ट रोजी पहाटे ऑटोचालक अलीमोदीन यांचा मृतदेह सापडला.  

Auto accident on Sheluwada bridge, one dies after falling into water | शेलूवाडा पुलावर ऑटो अपघात, पाण्यात पडून एकाचा मृत्यू

शेलूवाडा पुलावर ऑटो अपघात, पाण्यात पडून एकाचा मृत्यू

googlenewsNext

वाशिम :  कारंजा लाड तालुक्यातील शेलुवाडा नजिक रस्त्यावरील महामार्गानजिक असलेल्या धरणाच्या पुलावर ऑटो अपघात होऊन एकाचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना २० ऑगस्ट रोजी रात्रीच्या दरम्यान घडली. २१ ऑगस्ट रोजी पहाटे ऑटोचालक अलीमोदीन यांचा मृतदेह सापडला.  

कारंजा ते मंगरूळपीर महामार्गाला लागुनच असलेल्या कारंजा लगतच्या शेलुवाडा धरणाच्या पुलावर झालेल्या अपघातात कारंजा येथील ॲपे चालकासह ॲपेसह दोन जण धरणात फेकले गेले, यात एकजण रात्रीच  बाहेर आला पण एक जण बुडाला.  बुडालेल्या व्यक्तीला शोधण्यासाठी तात्काळ कारंजा ग्रामीण पोलिसांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांना माहीती देऊन तात्काळ रेस्क्यु ऑपरेशन करिता पाचारण केले.  

क्षणाचाही विलंब न करता मंगरूळपीर शाखेचे आपले सहकारी अतुल उमाळे, गोपाल गीरे, लखन खोडे,दत्तात्रय मानेकर,प्रदिप बुधे यांना २१ ऑगस्ट राेजी सकाळी ५.३० वाजता घटनास्थळी पाठविले आणी कारंजा ग्रामीण पो.स्टे.चे ठाणेदार व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांचे आदेशाने तात्काळ सर्च ऑपरेशन चालु केले . सकाळी ८.३० वाजता धरणातील मृतदेह शोधून बाहेर काढला.  मृतक हे ॲटो चालक अलीमोदीन काजी रा.कारंजा (लाड) वय अंदाजे. (३८) वर्ष आणी अपघातील जखमी वसिमखान वय (३६) वर्ष रा. कारंजा (लाड) हे असल्याचे निष्पन्न झाले.  यावेळी घटनास्थळी कारंजा एसडीओ ललितकुमार व-हाडे , तहसीलदार कुणाल झाल्टे ,कारंजा ग्रामीणचे कदम  पोलीस कर्मचारी हजर होते.
 

Web Title: Auto accident on Sheluwada bridge, one dies after falling into water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात