कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात वाहनाला अपघात; ३० कोंबड्या ठार, चालकासह दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 18:39 IST2018-03-20T18:39:02+5:302018-03-20T18:39:02+5:30
आसेगाव: रस्त्यावर आडव्या आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटून चालकासह दोघे गंभीर जखमी झाला. ही घटना २० मार्च रोजी सकाळी मंगरुळपीर तालुक्यातील गोलवाडी फाट्यानजिक घडली.

कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात वाहनाला अपघात; ३० कोंबड्या ठार, चालकासह दोघे जखमी
आसेगाव: रस्त्यावर आडव्या आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटून चालकासह दोघे गंभीर जखमी झाला. ही घटना २० मार्च रोजी सकाळी मंगरुळपीर तालुक्यातील गोलवाडी फाट्यानजिक घडली.
वाशिमकडून कोंबड्या घेऊन कारंजाकडे जात असलेले वाहन मंगरुळपीर तालुक्यातील गोलवाडी फाट्यानजिक आले असता रस्त्यावर एक कुत्रा धावत आला. त्या कुत्र्याला वाचविण्याचा प्रयत्न चालकाने केला. त्यावेळी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. या अपघाता वाहनातील ३० कोंबड्या ठार झाल्या, तर चालक आणि सोबतचा एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. या दोघांनाही घटनास्थळी उपस्थित लोकांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातात वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी वृत्त लिहित असेपर्यंत मंगरुळपीर पोलिसांत घटनेची नोंद झालेली नव्हती.