गतवर्षीच्या पीक नुकसानासाठी मदत मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 17:53 IST2018-12-15T17:52:38+5:302018-12-15T17:53:01+5:30
वाशिम: मार्च २०१७ मध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या पीक नुकसानाबद्दल शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने ५९ लाख ९६ हजार रूपयांचा निधी १३ डिसेंबर रोजी मंजूर केला आहे.

गतवर्षीच्या पीक नुकसानासाठी मदत मंजूर
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: मार्च २०१७ मध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या पीक नुकसानाबद्दल शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाने ५९ लाख ९६ हजार रूपयांचा निधी १३ डिसेंबर रोजी मंजूर केला आहे. यात अमरावती विभागातील चार तालुक्यातील ६ गावांचा समावेश आहे.
गतवर्षी मार्च महिन्यात राज्यात अवेळी आलेला पाऊस आणि गारपिटीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी महसूल व कृषी विभागाच्यावतीने नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून संयुक्त पंचनामा करण्यात आला. यात अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील पातूर, बाभुळगाव. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी आणि केळापूर तालुक्यातील बोरगाव, पहापळ, पाटणबोरी आणि वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील मिळून ४१३.२५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले होते. या नुकसानाबद्दल शेतकºयांना शेतकºयांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली. त्या अनुषंगाने राज्यात या कालावधीत अवेळी पाऊस आणि गारपिटग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत देण्यासाठी ५९ लाख ९६ हजार ६४१ रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शासनाच्या निर्देशानुसार शेतकºयांच्या थेट खात्यावर मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.