रहदारीच्या रस्त्यावर महिलेवर प्राणघातक हल्ला, पोलिस स्टेशन समोर घटना
By नंदकिशोर नारे | Updated: November 10, 2022 21:11 IST2022-11-10T21:10:52+5:302022-11-10T21:11:07+5:30
प्रकृती चिंताजनक असल्याने तिला अकोला येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.

रहदारीच्या रस्त्यावर महिलेवर प्राणघातक हल्ला, पोलिस स्टेशन समोर घटना
वाशिम : अकोला नाका ते पाटणी चौक या रहदारीच्या रस्त्यावर भर दिवसा एका तरुणाने एका महिलेच्या पोटात तीक्ष्ण हत्याराने वार केले. महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला अकोला येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. ही घटना ग्रामीण पोलिस स्टेशन समोरील गेट जवळ सायंकाळी ५ वाजताचे सुमारास घडली.
वाशिम शहरातील दूध डेअरी जवळ (अकोला नका) वास्तव्यास असलेली रंजना पौळकर ही महिला आपल्या दोन मैत्रिणीसोबत सायंकाळी ५ वाजताचे सुमारास पाटणी चौकाकडे जात होती. दरम्यान ग्रामीण पोलिस स्टेशन जवळ रंजना हिला गाठून एका तरुणाने अचानक चाकूने पोटात सपासप वार केले. यामध्ये रंजना ही रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावरच बेशुद्ध अवस्थेत पडून राहली. त्यानंतर गंभीर जख्मी असलेल्या रंजना हिला सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला अकोला येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.
प्राणघातक हल्ला करणारा युवक हल्ला करून ड्रीमल्यांड सिटी मार्गे रिसोड रोड कडे पसार झाला. हल्ला करणाऱ्या युवकाने रक्ताने माखलेले शर्ट व हत्यार रस्त्यामध्येच फेकून दिले. त्यापैकी त्याचा शर्ट पोलिसांना आढळून आला. वृत्त लीहेपर्यंत पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल झाला नव्हता.