शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
8
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
9
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
10
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
11
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
12
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
13
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
14
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
15
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
16
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
17
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
18
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
19
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
20
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रेरणा’च्या मानधनापासून ‘आशा’ वंचित!

By admin | Updated: April 8, 2017 22:20 IST

वाशिम जिल्ह्यातील स्थिती; डिसेंबर २0१५ पासून प्रश्न प्रलंबित

वाशिम : प्रेरणा प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील दोन लाख कुटूंबांच्या सर्वेक्षणाचे काम आशा सेविकांनी इमानेइतबारे पार पाडले. याबदल्यात त्यांना प्रतीकुटूंब पाच रुपये मानधन दिले जाणार होते. मात्र, शासनाच्या या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी झटणार्‍या जिल्ह्यातील ९३0 आशा सेविकांनी डिसेंबर २0१५ पासून एकही रुपया मानधन मिळाले नाही. जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा यासाठी कारणीभूत ठरल्याची माहिती आहे. मानसिकदृष्ट्या खचलेल्या विदर्भातील शेतकर्‍यांना नैराश्येच्या गर्तेतून बाहेर काढून त्यांना आत्मभान प्रदान करण्यासाठी शासनाने प्रेरणा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. याअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील दोन लाख शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी आशा सेविकांना देण्यात आली. त्यानुसार ९३0 आशां सेविकांनी हे काम चोखपणे पार पाडले. तब्बल तीनवेळा शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण झाले. त्यापैकी दोनवेळा झालेल्या सर्वेक्षणाच्या मानधनाची बिले जिल्हा परिषद प्रशासनाकडून जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे सादर करण्यात आली; मात्र याबाबत जिल्हा सामान्य रुग्णालयाने हलगर्जीपणाचा प्रत्यय देत डिसेंबर २0१५ पासून आजतागायत एकाही आशा सेविकेला मानधन देण्यात आले नाही. आशा सेविकांच्या थकीत मानधनाचा हा आकडा तब्बल २0 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन आशा सेविकांच्या मानधनाबाबत घेत असलेल्या दुटप्पीपणाच्या भूमिकेमुळे तीसर्‍यांदा झालेल्या सर्वेक्षणाची बिलेच तालुकास्तरावरून सादर करण्यात आलेली नाहीत. या अन्यायाप्रती जिल्ह्यातील सर्वच आशा सेविका आंदोलन उभारण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.जिल्हा परिषदेकडून सर्वच आशा सेविकांच्या मानधनाचे प्रस्ताव जिल्हा सामान्य रुग्णालयास अगदी वेळेत सादर करण्यात आला. मात्र डिसेंबर २0१५ पासून कुठल्याच आशा सेविकेला मानधन देण्यात आले नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयाने त्यांच्याकडे प्रलंबित असलेला मानधनाचा हा प्रश्न विनाविलंब निकाली काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा आहे.- अनिल उंदरेसमन्वयक, आशा सेविका, वाशिमप्रेरणा प्रकल्पांतर्गत शेतकरी कुटूंबियांच्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील सर्वच आशा सेविकांचे मानधन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची पद्धत आहे. मात्र या प्रक्रियेस संबंधित बँकांनी सहकार्य केले नाही. त्यामुळेच डिसेंबर २0१५ पासून आजतागायत हा प्रश्न प्रलंबित राहिला. असे असले तरी लवकरच थांबलेली प्रक्रिया पूर्ण करून आशा सेविकांना देय असलेले मानधन अदा करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. - डॉ.एन.बी.पटेलजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम