वनपरिक्षेत्रातील नववर्षाच्या पार्ट्यांवर आसेगाव पोलिसांचा ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 15:08 IST2018-12-30T15:08:11+5:302018-12-30T15:08:16+5:30
आसेगाव पोलिसांच्यावतीने परिसरातील जंगली भागांत ३१ डिसेंबरच्या रात्री होणाºया पार्ट्यांवर वॉच ठेवला जाणार असून, युवा पिढीने नववर्षाचे स्वागत मद्यप्राशनाने न करता मिष्टान्न वाटून करावे, असे आवाहन ठाणेदार रऊफ शेख यांनी केले आहे.

वनपरिक्षेत्रातील नववर्षाच्या पार्ट्यांवर आसेगाव पोलिसांचा ‘वॉच’
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव पो. स्टे. (वाशिम) : नव वर्षाच्या स्वागतासाठी अनेक युवक रात्रीच्या वेळी जंगली भागात मेजवाणीची तयारी करतात. अशा प्रकारातून अप्रिय घटना घडण्याची भिती असते, या पृष्ठभूमीवर आसेगाव पोलिसांच्यावतीने परिसरातील जंगली भागांत ३१ डिसेंबरच्या रात्री होणाºया पार्ट्यांवर वॉच ठेवला जाणार असून, युवा पिढीने नववर्षाचे स्वागत मद्यप्राशनाने न करता मिष्टान्न वाटून करावे, असे आवाहन ठाणेदार रऊफ शेख यांनी केले आहे.
आसेगाव परिसर हा जंगली भागाने वेढलेला परिसर असून, अनेक युवक नववर्षाचे स्वागत जंगली भागांत रात्री पार्ट्यांचे आयोजन करून करतात. यावेळी मद्यप्राशन करण्याचा प्रकारही होतो. त्यामुळे एखादी अप्रिय घटना घडण्याची भिती असते. यापूर्वी आसेगाव परिसरात अशी घटना घडली नसली, तरी इतर ठिकाणी नववर्षाच्या पार्टीतून गुन्हेगारीच्या घटना घडल्याची उदाहरणे आहेत. याच पृष्ठभूमीवर आसेगाव पोलीस, अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी ३१ डिसेंबरच्या सायंकाळपासून आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया विविध मार्गावर पोलिसांच्यावतीने वाहनांची तपासणी करण्यात येणार असून, रात्री उशिरापर्यंत पेट्रोलिंग करून परिसरात लक्ष ठेवले जाणार आहे. दरम्यान, युवकांनी नववर्षाचे स्वागत मद्यप्राशन न करता, दूध, मिष्टान्नांचे सेवन करून हर्षोल्हासात नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन आसेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार रऊफ शेख यांनी केले आहे.