कलावंतांचा आज मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:44 IST2017-08-01T01:44:09+5:302017-08-01T01:44:40+5:30
कारंजा लाड : लोककलावतांच्या विविध मागण्यांसाठी विदर्भ लोककलामंचचे अध्यक्ष धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली १ आॅगस्ट रोजी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुपारी १२:३० वाजता विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

कलावंतांचा आज मोर्चा
ठळक मुद्देविविध मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजनविदर्भ लोककलामंचचे अध्यक्ष धांडे यांच्या नेतृत्वात निघणार मोर्चालोककलावंतांना मानधन देण्याची प्रमुख मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : लोककलावतांच्या विविध मागण्यांसाठी विदर्भ लोककलामंचचे अध्यक्ष धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली १ आॅगस्ट रोजी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुपारी १२:३० वाजता विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. लोककलावंतांना राज्यसरकारचे मानधन पाच हजार व दहा हजार रुपये केंद्र सरकारकडून देण्यात यावे, कलावंतांना घरकुल मिळाले पाहिजे, एस.टी.रेल्वे प्रवास मोफत पास मिळाली पाहिजे. आदी विविध मागण्यांसाठी कारंजा तालुक्यातील सर्व लोककलावंतांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.