वाशिम  जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू;  २२ कोरोना ‘पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 11:45 IST2021-02-01T11:45:12+5:302021-02-01T11:45:20+5:30

CoronaVirus News कोरोना रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद रविवारी घेण्यात आली.

Another death in Washim district; 22 corona 'positive' | वाशिम  जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू;  २२ कोरोना ‘पॉझिटिव्ह’

वाशिम  जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू;  २२ कोरोना ‘पॉझिटिव्ह’


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :    जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू, तर २२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ३१ जानेवारी रोजी ‘पॉझिटिव्ह’ आला. एकूण बाधितांची संख्या ७,१४४वर पोहोचली आहे. दरम्यान, रविवारी २१ जणांनी कोरोनावर मात केली.
जानेवारी महिन्यात कोरोना बाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून आला.  एका कोरोना रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद रविवारी घेण्यात आली. दरम्यान, रविवारी २२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील जुनी आययुडीपी येथील ५, पाटणी चौक येथील १, सिव्हिल लाईन्स येथील ४, केकतउमरा येथील १, रिसोड शहरातील १, एकलासपूर येथील १, शेलगाव राजगुरे येथील १, मालेगाव शहरातील १, डोंगरकिन्ही येथील २, मंगरुळपीर शहरातील २, कोठारी येथील १, मानोरा शहरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेर एका कोरोना बाधिताची नोंद झाली आहे.  जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांचा आकडा आता ७,१४४वर पोहोचला आहे. आतापर्यंत ६,८३६  जणांनी कोरोनावर मात केली, तर १५४ जणांचा मृत्यू झाला.

Web Title: Another death in Washim district; 22 corona 'positive'