‘समृद्धी’वर पुन्हा अपघात; दोन ठार, दोन गंभीर जखमी

By सुनील काकडे | Updated: September 29, 2023 19:16 IST2023-09-29T19:15:16+5:302023-09-29T19:16:50+5:30

वाहनाचा समोरचा टायर फुटल्याने घडली घटना

another accident on samruddhi highway two killed and two seriously injured | ‘समृद्धी’वर पुन्हा अपघात; दोन ठार, दोन गंभीर जखमी

‘समृद्धी’वर पुन्हा अपघात; दोन ठार, दोन गंभीर जखमी

सुनील काकडे, कारंजा लाड : वाहतूक सुरू झाली, तेव्हापासूनच नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरअपघातांची जणू मालिकाच सुरू आहे. त्यात आणखी एका घटनेची भर पडली असून २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील कार्ली यावर्डी (ता. कारंजा लाड, लोकेशन १६८) गावानजिक कारचा समोरचा टायर फुटून घडलेल्या अपघातात वजिराबाद (हैद्राबाद) येथील मो. सलीम हुसेन (३५) आणि आरीफ हुसेन (२८) हे दोन जण जागीच ठार झाले; तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले.

प्राप्त माहितीनुसार, चारचाकी वाहनाने चार जण हैदराबादकडे चालले होते. नागपूरवरून निघाल्यानंतर ते चुकीने समृद्धी महामार्गावर चढले. प्रवासादरम्यान कार्ली यावर्डी गावानजिक अचानक भरधाव वेगात असलेल्या वाहनाचा समोरचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात घडला. या घटनेत चाैघेही गंभीररित्या जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिकेने संबंधितांना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे मो. सलीम आणि आरीफ हुसेन या दोघांना डाॅक्टरांनी मृत घोषित केले. अन्य दोघांची प्रकृतीही गंभीर असून त्यांना उपचारार्थ इतरत्र हलविण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली.

Web Title: another accident on samruddhi highway two killed and two seriously injured