Washim: समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, उभ्या कंटेनरला धडकली कार, तीन जण गंभीर जखमी
By सुनील काकडे | Updated: August 4, 2023 18:56 IST2023-08-04T18:55:59+5:302023-08-04T18:56:28+5:30
Samriddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील मालेगाव इंटरचेंजनजिकच्या चॅनेल क्रमांक २३९ वर डिझेलची चोरी करून भरधाव वेगात धावणारी कार उभ्या कंटेनरला धडकली. यामुळे मोठा अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना ३ ऑगस्टच्या मध्यरात्री घडली.

Washim: समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, उभ्या कंटेनरला धडकली कार, तीन जण गंभीर जखमी
- सुनील काकडे
वाशिम : समृद्धी महामार्गावरील मालेगाव इंटरचेंजनजिकच्या चॅनेल क्रमांक २३९ वर डिझेलची चोरी करून भरधाव वेगात धावणारी कार उभ्या कंटेनरला धडकली. यामुळे मोठा अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना ३ ऑगस्टच्या मध्यरात्री घडली.
प्राप्त माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक २३९ वर वाहनांमधील डिझेलची चोरी करून भरधाव वेगात जाणाऱ्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उभ्या असलेल्या कंटेनरवर जावून आदळले. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात कार चकनाचूर झाली. अपघातग्रस्त वाहनांमधून दोन विविध क्रमांकाच्या नंबर प्लेट सापडल्याने पोलिसही गोंधळून गेले होते. यासह कारमधून डिझेलच्या काही कॅन व इतर साहित्य आढळून आले. या अपघातामधील गंभीर जखमींना अकोला येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.