समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; ट्रॅव्हल्स उलटली, १५ जण गंभीर जखमी
By सुनील काकडे | Updated: February 19, 2023 14:53 IST2023-02-19T14:53:27+5:302023-02-19T14:53:39+5:30
या अपघातात ट्रॅव्हल्समधून प्रवास करणारे सुमारे १५ प्रवाशी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग नियंत्रण कक्षाच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका तिथे दाखल झाली.

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; ट्रॅव्हल्स उलटली, १५ जण गंभीर जखमी
वाशिम: कारंजा शहरापासून काहीच अंतरावर असलेल्या वाढोणानजिक समृद्धी महामार्गावर नागपूरकडून मुंबईकडे जाणारी ट्रॅव्हल्स उलटल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघात १५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, १९ फेब्रूवारी रोजी पहाटेच्या सुमारास एन.एल. ०१ बी २२३९ या क्रमांकाची ट्रॅव्हल्स नागपूरवरून मुंबईच्या दिशेने जात होती. वाढोणानजिक चालकाला डुलकी लागल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स रस्त्यावरच आडवी होऊन उलटली.
या अपघातात ट्रॅव्हल्समधून प्रवास करणारे सुमारे १५ प्रवाशी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग नियंत्रण कक्षाच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका तिथे दाखल झाली. लोकेशनचे पायलट प्रशांत ठाकरे, किशोर खोडके यांनी घटनास्थळाची पाहणी करून जखमींना कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. राजू राठोड, रमेश देशमुख, विनाद खोड, श्याम घोडेस्वार आदिंनी तातडीने मदतकार्य पुरविले. जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना अकोला येथील रुग्णालयात ‘रेफर’ करण्यात आले; तर काही जखमींना नांदगाव येथे हलविण्यात आले.