समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; गाडीचा चक्काचूर, एक ठार १ गंभीर
By संतोष वानखडे | Updated: January 27, 2024 14:17 IST2024-01-27T14:17:22+5:302024-01-27T14:17:57+5:30
या अपघातात कारचा चुराडा झाला. ही अपघातग्रस्त कार पुण्यावरून समृद्धी महामार्गाने अमरावती येथे जात होती.

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; गाडीचा चक्काचूर, एक ठार १ गंभीर
वाशिम : समृद्धी महामार्गावरील मालेगाव परिसरात लोकेशन चायनल क्रमांक २३४ येथे धाावत्या कंटेनरला कारची मागून जोरदार धडक बसल्याने एक ठार एक गंभीर जखमी झाल्याची घटना २७ जानेवारीला घडली. शकील पठाण (२७) असे मृतकाचे नाव आहे.
समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना घडत आहेत. मालेगाव परिसरात शनिवारी अपघात झाल्याची माहिती मिळताच लोकेशन १०८ चे मालेगाव पायलट घटनास्थळी दाखल झाले व जखमींना तात्काळ रुग्णालयात रवाना केले. या अपघातात शकील पठाण (२७) या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर अनिकेत चंदू जाधव (२८) हा युवक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या अपघातात कारचा चुराडा झाला. ही अपघातग्रस्त कार पुण्यावरून समृद्धी महामार्गाने अमरावती येथे जात होती.