Another 24 corona positive in the district | जिल्ह्यात आणखी २४ कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आणखी २४ कोरोना पॉझिटिव्ह

जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गुरुवारी २४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील लाखाळा येथील १, मालेगाव तालुक्यातील आमखेडा येथील १, वसारी येथील १, रिसोड शहरातील गणेशनगर येथील १, महागाव येथील १, चिंचाबा येथील १, मंगरुळपीर शहरातील ४, दाभा येथील १, शेलूबाजार येथील १, पिंप्री अ. येथील १, कारंजा शहरातील विठ्ठल मंदिरजवळील परिसरातील २, नावरे कॉलनी परिसरातील १, सनराईज कॉलनी परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २, पोहा येथील १, मानोरा तालुक्यातील वसंतनगर येथील १, मोहगव्हाण येथील १ व इतर ठिकाणची १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेर एका कोरोनाबाधिताची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ६,९५६ वर पोहोचला आहे. आतापर्यंत ६६५१ जणांनी कोरोनावर मात केली.

०००

१५२ जणांवर उपचार

जिल्ह्यात आतापर्यंत ६,९५६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यापैकी ६,६५१ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरण येथे १५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

Web Title: Another 24 corona positive in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.