वाशिम जिल्ह्यात आणखी १२४ कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 12:29 IST2021-03-04T12:29:10+5:302021-03-04T12:29:17+5:30

CoronaVirus News आणखी १२४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ३ मार्च रोजी पाॅझिटिव्ह आला.

Another 124 corona positive in Washim district | वाशिम जिल्ह्यात आणखी १२४ कोरोना पाॅझिटिव्ह

वाशिम जिल्ह्यात आणखी १२४ कोरोना पाॅझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी १२४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल ३ मार्च रोजी पाॅझिटिव्ह आला. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ९,३६० वर पोहोचली आहे. बुधवारी ६२ जणांनी काेरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
गत काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे.  बुधवारी आणखी १२४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. यामध्ये वाशिम शहरातील सिव्हील हॉस्पिटल परिसरातील १, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील १, ईश्वरी कॉलनी येथील २, जनता बँक जवळील १, लाखाळा येथील २, विनायक नगर येथील २, गुरुवार बाजार परिसरातील १, गवळीपुरा येथील १, सुंदरवाटिका येथील १, नवीन आययुडीपी येथील १, जानकी नगर येथील १, गणेश नगर येथील २, सावरगाव जिरे १, नागठाणा येथील १, वाघळूद १, ब्रह्मा १, मोहजा रोड २, तांदळी शेवई ४, मंगरूळपीर शहरातील ५, लाही १, शेगी २, कासोळा येथील १, गोलवाडी १, स्वासीन येथील ३, शहापूर येथील २, मालेगाव शहरातील १२, इराळा येथील १, जऊळका येथील ६, डोंगरकिन्ही येथील ४, रिसोड शहरातील सिव्हील लाईन्स येथील २, समर्थ नगर येथील ६, गणेश नगर येथील ६, नेतान्सा येथील १, हराळ येथील १, मानोरा शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, कारंजा शहरातील भारतीपुरा येथील ११, बंजारा कॉलनी येथील १, राजनगर येथील १, पहाडपुरा येथील १, गुरुमंदिर परिसरातील ८, इंदिरा नगर येथील १, आदर्श नगर येथील २, सिंधी कॉलनी येथील २, यशवंत कॉलनी येथील २, जैन मंदिर येथील १, कांचन विहार कॉलनी येथील १, गौतम नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, कुपटी येथील २, म्हसला येथील ३, नरेगाव येथील १, किन्ही रोकडे येथील १, कामरगाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील २ बाधितांची नोंद झाली असून ६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाबाधितांचा आकडा ९,३६० वर पोहोचला असून, यापैकी आतापर्यंत १६१ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Another 124 corona positive in Washim district