वाशिम जिल्ह्यात आणखी ११७ कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 11:21 IST2021-03-11T11:20:39+5:302021-03-11T11:21:20+5:30

CoronaVirus in Washim जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १०,५८७ वर पोहोचली आहे.

Another 117 corona positive in Washim district | वाशिम जिल्ह्यात आणखी ११७ कोरोना पाॅझिटिव्ह

वाशिम जिल्ह्यात आणखी ११७ कोरोना पाॅझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम :  जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी ११७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १० मार्च रोजी पाॅझिटिव्ह आला. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या १०,५८७ वर पोहोचली आहे. बुधवारी १३१ जणांनी काेरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
गत काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. बुधवारी आणखी ११७ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. वाशिम शहरातील नवीन आययूडीपी २, अल्लाडा प्लॉट २, सामान्य रुग्णालय परिसर १, रेल्वेस्टेशन परिसर २, सिंधी कॅम्प १, छत्रपती शिवाजी चौक १ सिव्हील लाइन्स २, गवळीपुरा १, सुंदरवाटिका येथील २, लाखाळा १, होंडा शोरूम परिसरातील ६, संतोषीमातानगर १, अकोलानाका परिसरातील १, पोस्ट ऑफिस चौक परिसरातील १, पंचशीलनगर येथील २, आययूडीपी येथील १, काळे फाइल १, आडगाव १, खंडाळा शिंदे येथील १, हिवरा रोहिला ३, अनसिंग १०, उमरा का. १, सुकळी १, पिंपळगाव ३, धारकाटा २, तामसाळा येथील १, सुपखेला १, ब्रह्मा १, उमरा येथील १, बिटोडा तेली २, घोटा १, मंगरूळपीर शहरातील सुभाष चौक येथील ३, पंचशीलनगर १, बायपास रोड येथील १, चेहलपुरा १, वाॅर्ड क्र. १ परिसरातील १, संभाजीनगर २, सोनखास येथील १, मोरी १, शेलूबाजार १, लाठी १, कासोळा २, कुंभी येथील ४, शेंदूरजना येथील १, पेडगाव १, रिसोड शहरातील ७, केशवनगर १, चिंचाबापेन येथील २, आसोला १, केनवड ३, मालेगाव शहरातील २, भेरा १, मेडशी १, शेलगाव १, कारंजा शहरातील ५, पसरणी १, गिर्डा १, टाकळी १, मानोरा तालुक्यातील पोहरादेवी १, धावंडा १, असोला खु. येथील २, चिखली १, वसंतनगर २, साखरडोह येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ४ बाधितांची नोंद झाली असून १३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १०,५८७ वर पोहचला आहे.

Web Title: Another 117 corona positive in Washim district