पोलिसांचा अमरावती परिक्षेत्रीय कर्तव्य मेळावा होणार वाशिमला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 02:32 PM2019-08-18T14:32:28+5:302019-08-18T14:32:35+5:30

पोलिसांच्या अमरावती परिक्षेत्रीय कर्तव्य मेळाव्याचा मान यंदा वाशिमला मिळाला आहे.

Amravati Territorial Police meet will be held at Washim | पोलिसांचा अमरावती परिक्षेत्रीय कर्तव्य मेळावा होणार वाशिमला

पोलिसांचा अमरावती परिक्षेत्रीय कर्तव्य मेळावा होणार वाशिमला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कौशल्याची चाचणी घेण्यासाठी व त्यांच्यातील व्यावसायिक गुणवत्ता सुधारण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या पोलिसांच्या अमरावती परिक्षेत्रीय कर्तव्य मेळाव्याचा मान यंदा वाशिमला मिळाला आहे. हा मेळावा येथे १९ ते २१ आॅगस्ट या कालावधीत होणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिली.
याअंतर्गत आयोजित केल्या जाणाºया स्पर्धेत वाशिमसह अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि अमरावती असे ५ जिल्हे सहभागी होणार आहेत.६ मुख्य विषयांवरील २१ प्रकारच्या परीक्षा होणार असून त्यात शास्त्रोक्त पद्धतीने गुन्ह्यांचा तपास, तपासात संगणकाचा वापर, श्वान पथक, पोलिस फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी आदिंचा समावेश असणार आहे. या स्पर्धेत ३२ पोलिस अधिकारी आणि ८० कर्मचारी सहभागी होतील. पर्यवेक्षक म्हणून बाहेर जिल्ह्यातील ९ व वाशिम जिल्ह्यातील ११ अधिकारी कामकाज पाहणार आहेत. या स्पर्धेत पदक विजेत्या स्पर्धकास पुढे होणाºया राज्य पोलिस कर्तव्य मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांच्याहस्ते होणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिली.
 

Web Title: Amravati Territorial Police meet will be held at Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.