अमरावती विभागात महाबीजकडून ४. ४५ लाख क्विंटल बियाणे खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 03:22 PM2019-02-15T15:22:51+5:302019-02-15T15:22:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत खरीप हंगामात यंदा बिजोत्पादन प्रकल्पांतर्गंत १२३२० शेतकऱ्यांनी ...

Amravati Division Mahabeej Buy 4. 45 lakh quintals of seeds | अमरावती विभागात महाबीजकडून ४. ४५ लाख क्विंटल बियाणे खरेदी

अमरावती विभागात महाबीजकडून ४. ४५ लाख क्विंटल बियाणे खरेदी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत खरीप हंगामात यंदा बिजोत्पादन प्रकल्पांतर्गंत १२३२० शेतकऱ्यांनी विविध पिकांची पेरणी केली होती. या शेतकºयांनी तब्बल ४,४५,८८९ क्विंटल बियाण्यांचे उत्पादन केले असून, महाबीजने या शेतकºयांकडून बियाण्यांची खरेदी केली केली आहे.
महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत अमराती विभागातील अमरावती, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ आणि अकोला या पाच जिल्ह्यात १२२३० शेतकºयांनी ३२ हजार ४३० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, तूर, मुग, उडिद आणि इतर पिकांची पेरणी केली होती. या सर्व क्षेत्रात मिळून ४,४५,८८९ क्विंटलचे उत्पादन झाले. महाबीजकडून हा सर्व शेतमाल बियाणे प्रमाणिकरण प्रक्रियेसाठी मोजून घेतला आहे. या शेतमालाची प्रतवारी करून दर्जेदार बियाणे वेगळे काढण्यात येणार आहे. त्यानंतर या बियाण्यांची शासकीय प्रयोगशाळेत उगवण क्षमता तपासली जाणार आहे. या तपासणीत पारित झालेले बियाणे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, बियाणे उत्पादनात विभागात वाशिम जिल्ह्यात अग्रस्थानी असून, या जिल्ह्यात ३८५२ शेतकºयांनी ११,६०० पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रात २०१६८८ क्विंटल बियाणे उत्पादित केले आहे. त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यात ५६५२ शेतकºयांनी १४५९ हेक्टर क्षेत्रात १७५२४५ क्विंटल बियाण्यांचे उत्पादन केले आहे. आता रब्बीच्या बियाण्यांची मोजणी सुरू असून, या दोन्ही जिल्ह्याचे प्रमाण अधिक वाढणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
 

Web Title: Amravati Division Mahabeej Buy 4. 45 lakh quintals of seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.