शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांवर संकटाची मालिका कायमच!

By admin | Updated: September 23, 2014 01:11 IST

बियाण्यांपासून तर उत्पन्न हाती घेईपर्यंत अनेक समस्यांना करावा लागतोय सामना

वाशिम: जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर संकटाची मालीका सुरूच असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पेरणीसाठी आवश्यक असलेल्या बियाण्यांपासून तर पिक हाती येईपर्यंत यावर्षी शेतकर्‍यांना संकटाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.मृग नक्षत्राला सुरूवात होण्याआधी जिल्हयातील सर्वंच शेतकर्‍यांनी पेरणीच्या दृष्टीकोनातून शेत तयार करून ठेवले होते. जिल्हयाचे प्रमुख पिक सोयाबीन असल्याने सोयाबीन चे बियाणे मिळविण्याकरीता शेतकर्‍यांना मोठी कसरत करावी लागली. गतवर्षी खरिप हंगामात जास्त व सतत पाऊस पडल्याने सोयाबीनचे पीक भिजल्या गेले व यामुळे सोयाबीनची प्रत खराब होवून उगवण शक्ती कमी झाली. या प्रकारामुळे बियाण्यांची कमतरता भासली. घरी असलेल्या बियाण्यांची उगवण क्षमता घरातील कुंडीव्दारे व गोणपटाव्दारे तपासली यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी संशोधन केंद्राचे शेतकर्‍यांना मार्गदर्शन लाभले. कसेबसे बियाण्यांची जुळवाजुळव केली मात्र मृग नक्षत्रात अर्धाअधिक महिना उलटून गेल्यानंतरही समाधानकारक पाऊस झाला नाही यामुळे शेतकर्‍यांच्या पेरण्या वेळेवर होवू शकल्या नाहीत.मृग नक्षत्रानंतर १७ ते १८ दिवसानंतर पाऊस आला म्हणून शेतकर्‍यांनी पेरण्या केल्यात. त्यानंतर जी पावसाने दडी मारली की बियाणे जमिनीतून बाहेरचं आले नाही पर्यायी शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरणी नंतरही पिकांना जीवनदान मिळेल असा पाऊस बरसला नसल्याने अनेक भागातील शेतकर्‍यांवर तिबार पेरणीचे संकट ओढविले. एवढे सर्व असताना नाईलाजाने काही शेतकर्‍यांनी ठिंबक सिंचनावर पिकांचे संरक्षण केले. लगेचच यानंतर मधात पिकांवर जिवाणू व बुरशीजन्य रोग आला. या संकटातून कसेबसे शेतकरी निघाले नाही तो पिकांवर पिवळा मोझ्ॉक आला व जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात २0 ते १५ टक्के पिकांचे नुकसान केले. या नुकसानीपासून शेतकर्‍यांना वाचविण्याकरीता कृषी विभागानेही मोलाचे सहकार्य केले परंतु त्याचाही काही फारसा उपयोग झाला नसल्याचे दिसत आहे.