खंडणी प्रकरणातील पाचही आरोपींना पोलीस कोठडी!
By संतोष वानखडे | Updated: March 15, 2023 19:09 IST2023-03-15T19:09:09+5:302023-03-15T19:09:32+5:30
मानोरा येथील वाईनबार मालकास खंडणी मागून मारहाण केल्याप्रकरणातील पाचही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली.

खंडणी प्रकरणातील पाचही आरोपींना पोलीस कोठडी!
वाशिम: मानोरा येथील वाईनबार मालकास खंडणी मागून मारहाण केल्याप्रकरणातील पाचही आरोपींना बुधवारी (दि.१५) न्यायालयात हजर केले असता, विद्यमान न्यायालयाने १७ मार्चपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावली.
फिर्यादी संदीप सुर्यकांत जयस्वाल रा. संतोषीमाता नगर मानोरा यांच्या फिर्यादीनुसार, ते वाईनबार चालवतात. त्यांच्या घराचा खालचा मजला हकिब यांना भाड्याने दिला. आरोपी राजू लसनकार व त्याची दोन मुले फिर्यादीला वारंवार धमक्या देतात की, घर भाड्याने का दिले? ते खाली कर, नाही तर मानोऱ्यात राहू देणार नाही, तसेच येथे राहायचे असेल तर महिन्याला ५० हजार रुपये लागतील, नाहीतर घर सोडावे लागेल, अशी धमकी देत होते. १४ मार्चला आरोपींनी फिर्यादीला मारहाणही केली.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राजू सुभाष लसनकार, शाम राजू लसनकार, आशिष राजू लसनकार , सागर महादेव कंटाळे, नागेश वानखडे यांचे विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल करीत अटक केली होती. १५ मार्चला विद्यमान न्यायालयाने आरोपींना १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या घटनेचा अधिक तपास मानोऱ्याचे प्रभारी ठाणेदार महेश कुचेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर नागरे करीत आहेत.