शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला-वाशिम महामार्गावर : ट्रकची दुचाकीला धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 15:29 IST

रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.

एक गंभीर: मालेगाव तालुक्यातील घटनालोकमत न्यूज नेटवर्कमेडशी (वाशिम):  ट्रकची जबर धडक लागून घडलेल्या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीपैकी पती जागेवरच ठार, तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना अकोला-वाशिम महामार्गावर मालेगाव तालुक्यातील रिधोरा फाट्यानजिक शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. रमेश राठोड, असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांची पत्नी संगीता रमेश राठोड या गंभीर जखमी आहेत. हे दोघेही मोठी उमरी अकोला येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी ट्रक व चालक ताब्यात घेतले आहे.प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास एच.आर. ७४, ए. ५४९० क्रमांकाचा ट्रक अकोलाहून मालेगावकडे येत होता. त्याचवेळी रमेश राठोड हे त्यांच्या पत्नी संगीता राठोड यांच्यासह एम.एच-३०, एझेड ७६१ क्रमांकाच्या दुचाकीने मालेगाव येथून रिधोराकडे जात होते. रिधोरा फाट्यानजिक त्यांच्या दुचाकीला उपरोक्त क्रमांकाच्या ट्रकची जबर धडक लागली. त्यात रमेश प्रेमसिंग राठोड (४५)  हे जागेवरच ठार झाले, तर त्यांच्या पत्नी संगीता रमेश राठोड गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी ट्रकचालक मो. नूर बिलाल ताहीर (३२), रा. गंडुरी ता. फे्रजपूर झटका, (हरियाणा) याला ट्रकसह ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :washimवाशिमAccidentअपघात