अकाेला - वाशिम महामार्गाच्या कडेला ओंडक्यांचे ढीग, अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 11:17 AM2021-03-21T11:17:52+5:302021-03-21T11:19:02+5:30

Akala - Washim highway चाैपदरीकरणाचे काम करताना अकाेल्यापासून ते मेडशीपर्यंत दुतर्फा लिंबाचे वृक्ष ताेडले जात आहेत.

Akala - Washim highway sidewalk piles, inviting accidents | अकाेला - वाशिम महामार्गाच्या कडेला ओंडक्यांचे ढीग, अपघाताला निमंत्रण

अकाेला - वाशिम महामार्गाच्या कडेला ओंडक्यांचे ढीग, अपघाताला निमंत्रण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम   : अकाेला - वाशिम दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या चाैपदरीकरणाचे काम सुरु आहे. सदर काम मेडशी-मालेगावपर्यंत  करण्यात आले. चाैपदरीकरणाचे काम करताना अकाेल्यापासून ते मेडशीपर्यंत दुतर्फा लिंबाचे वृक्ष ताेडले जात आहेत. ताेडलेल्या वृक्षांचे ओंडके रस्त्याच्या दाेन्ही  बाजूला तसेच पडून असल्यामुळे या मार्गावर अपघाताच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे.
अकाेल्यापासून वाशिम जिल्ह्यात चाैपदरीकरणाच्या कामाचे कंत्राट गुजरातच्या माेंटाे कार्लाे कंपनीने घेतले आहे. त्यांचे कार्यालय मालेगाव नजीक आहे. सदर कंपनीने रस्त्याच्या चाैपदरीकरणासाठी महामार्गाच्या दुतर्फा इंग्रज काळात लावण्यात आलेले लिंबाचे वृक्ष ताेडण्याची माेहीम हाती घेतली आहे. ताेडलेल्या वृक्षांचा मलबा रस्त्याच्या दुतर्फा पडून असल्यामुळे अपघातामध्ये कमालीची वाढ झाली असताना संबंधितांकडून काेणतीच उपाययाेजना केल्या जात नसल्याचे समाेर आले आहे. 
रस्त्याच्या कडेला टाकून ठेवण्यात आलेले लाकडाचे ओंडके रात्रीच्या वेळी वाहनचालकांना दिसून येत नसल्याने अपघातात वाढ झाली आहे. दरराेज या मार्गावर किरकाेळ स्वरुपाचे अपघात हाेत असताना संबंधित कंपनी माेठ्या अपघाताची प्रतीक्षा करीत आहे का असा प्रश्न वाहनधारक विचारत आहेत. विशेष म्हणजे या कामावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालय वाशिम यांच्याकडे देखरेखीची जबाबदारी साेपविण्यात आली असताना त्यांच्याकडूनही काेणतीच दखल घेण्यात आली नसल्याचे दिसत  आहे. 
गावातील काही नागरिक रात्रीच्या वेळी  लाकडे चाेरुन नेत आहेत. मात्र यावर ना कंपनी ना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयातील अधिकाऱ्यांना काही देणे घेणे नसल्याचे चित्र आहे. सदर कंपनीच्या वेळकाढू धाेरणामुळे वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहे. वृक्षताेड करताना अनावश्यक झाडांचीही कत्तल केली जात असल्याची बाब समाेर आली आहे. यामुळे या वृक्षताेडीची सखाेल चाैकशी करण्याची मागणी जिल्ह्यातील वृक्षप्रेमी करीत आहेत. यासंदर्भात माेंटाे कार्लाे कंपनीचे  सिनिअर मॅनेजर राजू तिवारी यांच्यासाेबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध हाेऊ शकले नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने लक्ष देऊन यावर तातडीने उपाययाेजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Akala - Washim highway sidewalk piles, inviting accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.