वनशेती वाढविण्यावर कृषी विभागाचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 01:57 PM2018-09-30T13:57:33+5:302018-09-30T13:57:52+5:30

वाशिम: शेतकऱ्यांचा वनशेतीकडे कल वळविण्यासाठी कृषी विभाग सरसावला आहे. वनशेतीसाठी शासकीय रोपवाटिकेतून रोपे उपलब्ध करून देण्यासह लागवडीसाठी शेतकºयांना चार वर्षांत टप्प्याटप्प्याने अनुदानही देण्यात येणार आहे.

 Agriculture Department's emphasis on extension of forests | वनशेती वाढविण्यावर कृषी विभागाचा भर

वनशेती वाढविण्यावर कृषी विभागाचा भर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: शेतकऱ्यांचा वनशेतीकडे कल वळविण्यासाठी कृषी विभाग सरसावला आहे. वनशेतीसाठी शासकीय रोपवाटिकेतून रोपे उपलब्ध करून देण्यासह लागवडीसाठी शेतकºयांना चार वर्षांत टप्प्याटप्प्याने अनुदानही देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील एका तालुक्यात ही योजना राबविण्यात येत असून, वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात ही योजना राबविण्यात येत आहे.
वातावरणातील बदलांमुळे शेती क्षेत्रातील दुष्परिणाम कमी व्हावेत आणि शेतकरी खुशाल व्हावा यासाठी केंद्र शासनाने वनशेती विषयक धोरण २०१४ मध्येच लागू केले होते. शेतीपूरक वृक्षलागवडीचा क्षेत्र विस्तार हा या अभियानामागचा केंद्र शासनाच्या मुख्य उद्देश आहे. तथापि, याबाबत शेतकरी फारसे उत्सूक असल्याचे दिसत नाही. त्यामुळे या योजनेचा व्यापक प्रसार करून शेतकºयांचा कल याकडे वळविण्याच्या सुचना कृषी विभागांतर्गत येणाºया रोपवाटिकांना देण्यात आल्या आहेत. शेतीच्या परिघीय क्षेत्राचा व बांधाचा शेतकºयांना जास्तीत जास्त उपयोग करता यावा याकरिता शेतकºयांना वनशेती अंतर्गत लागवडीनुसार अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी एकूण खर्चाच्या ५० टक्के अनुदान मिळणार असून, सदर अनुदान शेतकºयांना चार वर्षात चार टप्प्यात देण्यात येणार आहे. शेतकºयांनी वनवृक्ष लागवडीसाठी शासकीय रोपवाटिकेत रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. फळरोपाचे दर प्रति २५ रुपये, तर वनवृक्षाचे दर प्रति ८ रुपये आहेत.

शासनाच्या निर्देशानुसार शेतकºयांचा वनशेतीकडे कल वाढविण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत शेतकºयांसाठी सीताफळ, बांबू, करंज, फणस, जांभूळ, आणि चिंच यांची रोपे उपलब्ध आहे.
-शीतल नागरे
कृषी अधिकारी
(शासकीय रोपवाटिका मंगरुळपीर)

Web Title:  Agriculture Department's emphasis on extension of forests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.