शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार निवारण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

By admin | Updated: April 17, 2017 02:24 IST

महसूल विभाग : १७ ते ३० एप्रिलदरम्यान स्वीकारणार तक्रारी, पीडितांना न्याय देण्याचा प्रयत्न

वाशिम : नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याच्या दृष्टिकोनातून महसूल विभागाने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. त्यानुसार १७ ते ३० एप्रिल २०१७ या दरम्यान प्रत्येक तहसील कार्यालय स्तरावर नागरिकांच्या तक्रारी लेखी स्वरुपात स्वीकारल्या जाणार आहेत. या तक्रारींचा निपटारा उपविभाग स्तरावर केला जाणार आहे.दैनंदिन कामकाज करताना नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. महसूल विभाग व अन्य प्रशासकीय विभागाकडे प्रलंबित कामाबाबत वारंवार पाठपुरावा करूनही काही प्रकरणात न्याय मिळत नाही. पीडितांना न्याय देण्यासाठी आणि प्रलंबित प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्याच्या दृष्टिकोनातून वाशिमच्या महसूल विभागाने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ आखला आहे. पहिल्या टप्प्यात वाशिम उपविभागातील रिसोड, मालेगाव व वाशिम तालुक्यातील नागरिकांना आपल्या तक्रारी १७ ते ३० एप्रिल या दरम्यान तहसील कार्यालय स्तरावर दाखल करता येणार आहेत. प्राप्त तक्रारीनुसार पीडितांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.जमीनविषयक प्रकरणे, रेशन, दहावी व बारावीनंतर लागणारी विविध कागदपत्रे व प्रमाणपत्रे, प्रलंबित असलेले फेरफार, भूसंपादन झाल्यानंतरही मोबदला न मिळणे, गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले रस्ते व पांदण रस्ते, प्रलंबित कृषीपंप जोडणी, पात्रता असूनही व प्रस्ताव सादर करूनही शासकीय योजनांचा लाभ न मिळणे, यासह प्रलंबित कामांसंदर्भात नागरिकांना या ‘अ‍ॅक्शन प्लॅन’च्या माध्यमातून तक्रारी मांडण्यासाठी व्यासपीठ मिळणार आहे. प्रलंबित कामांचा जागेवरच निपटारा करण्यासाठी नागरिकांनी १७ ते ३० एप्रिलदरम्यान तहसील स्तरावर लेखी स्वरूपात तक्रारी दाखल करणे आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात वाशिम उपविभागात अंमलबजावणी होणार असून, त्यानंतर मंगरूळपीर व कारंजा उपविभागात याच पद्धतीने कार्यवाही होणार आहे.पालकमंत्र्यांच्या सूचनांची अंमलबजावणीवाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी नुकतीच जिल्हास्तरीय शासकीय विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली होती. यावेळी ना. राठोड यांनी नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यासाठी निश्चित कार्यक्रम आखण्याच्या सूचना दिल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारी कोणत्या स्वरुपाच्या आहेत, या तक्रारींचा निपटारा कसा करता येईल, या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना ना. राठोड यांनी केल्या होत्या. त्यानुसार महसूल विभागाने अ‍ॅक्शन प्लॅन तयार करून १७ एप्रिलपासून तक्रारी स्वीकारण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे.