Accused of murdering wife remanded in judicial custody | पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीस न्यायालयीन कोठडी

पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीस न्यायालयीन कोठडी

मंगरुळपीर : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना १० रोजी एप्रिलला तालुक्यातील मानोली येथे घडली होती.पोलिसांनी  आरोपी पतीस ११ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

 फिर्यादी श्रीकृष्ण वाकोडे (५१)रा आरखेड ता मूर्तिजापूर यांनी पोलिसांत तक्रार दिली की,आरोपी रोशन विजय उगले (२५) रा मानोली याने त्याची पत्नी रिना रोशन उगले (२०) हिस १० एप्रिल रोजी चारित्र्यावर संशय घेऊन लोखंडी पाईपने तसेच फरशीवर डोके आदळून ठार मारले. अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली होती.दरम्यान ११ एप्रिल रोजी या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी एपीआय निलेश शेंम्बडे यांनी आरोपी पतीस वाशीम येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

Web Title: Accused of murdering wife remanded in judicial custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.