लाॅकडाऊननंतर अपघाताच्या घटना वाढल्या; मृत्यूसंख्येतही वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 12:06 PM2020-10-20T12:06:43+5:302020-10-20T12:08:26+5:30

Washim District, Accidents लाॅकडाऊन खुला झाल्यानंतर तब्बल ११९ अपघाती घटना घडल्या.

Accidents increased after the lockdown; The death toll has also risen | लाॅकडाऊननंतर अपघाताच्या घटना वाढल्या; मृत्यूसंख्येतही वाढ 

लाॅकडाऊननंतर अपघाताच्या घटना वाढल्या; मृत्यूसंख्येतही वाढ 

Next
ठळक मुद्देजून ते सप्टेंबर या कालावधीत अपघाताच्या ११९ घटना घडल्या. यामध्ये ६३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. 

- शिखरचंद बागरेचा  
 वाशिम : लाॅकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर पुन्हा वाहनांचा भरधाव वेगाने प्रवास सुरू झाला असून, अपघाताच्या घटना आणि मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येते. चालू वर्षात जून ते सप्टेंबर या कालावधीत अपघाताच्या ११९ घटना घडल्या असून, यामध्ये ६३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. 
यंदा कोरोनाचे संकट असल्याने याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्च ते मे महिन्यापर्यंत लाॅकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी झाली. जानेवारी ते मार्च यादरम्यान जिल्ह्यात अपघाताच्या ३८ घटना होत्या. लाॅकडाऊनदरम्यान केवळ सात अपघात झाले होते. लाॅकडाऊन खुला झाल्यानंतर तब्बल ११९ अपघाती घटना घडल्या.

Web Title: Accidents increased after the lockdown; The death toll has also risen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.