आपघातग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सवर १५ दिवसापूर्वी पडला होता कारंजानजीक  दरोडा; आज काळाचा घाला

By नंदकिशोर नारे | Updated: July 1, 2023 10:50 IST2023-07-01T10:49:39+5:302023-07-01T10:50:24+5:30

Buldhana Bus Accident: त्याच बसचा अपघात होऊन जिवितहानी झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

accidental vidarbha travels was trying robber in the karanja 15 days ago | आपघातग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सवर १५ दिवसापूर्वी पडला होता कारंजानजीक  दरोडा; आज काळाचा घाला

आपघातग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सवर १५ दिवसापूर्वी पडला होता कारंजानजीक  दरोडा; आज काळाचा घाला

नंदकिशोर नारे, वाशिम: नागपुर येथून पुणे साठी जाणा-या विदर्भ ट्रॅव्हल्सचा टायर फुटून झालेल्या अपघातात २६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना  १ जुलै रोजी रोजी दिड वाजताच्या दरम्यान सिंदखेडराजा नजीक पिंपळखुटा फाटयाजवळ घडली. याच अपघातग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सवर १५ दिवसापुर्वी कारंजा जनीक दरोडा टाकून गाडी लुटण्याचा प्रयत्न  करण्यात आला होता. यात ३ प्रवासी जखमी झाले होते.                                                  

जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील कारंजा जवळ १८ जून च्या रात्री साडेबाराच्या सुमारास नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला दगडफेक करून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती . दरोडेखोरांच्या बस लुटण्याच्या प्रयत्नात बसमधील पाच ते सात प्रवासी गंभीर जखमी झाले होते .  त्याच बसचा अपघात होऊन आज जिवित हानी झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

Web Title: accidental vidarbha travels was trying robber in the karanja 15 days ago