मानोरा-मंगरुळपीर रस्त्यावर  वाहनाचे टायर फुटल्याने अपघात;  दोन गंभीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 13:33 IST2018-04-02T13:33:16+5:302018-04-02T13:33:16+5:30

मानोरा : मानोरा-मंगरुळपीर रस्त्यावर संत वामन महाराज सेवाश्रमानजिक स्विफ्ट डिझायर गाडीचे टायर फुटल्याने गाडीने झाडाला धडक दिली.

Accident on Manora-Mangrulpir road; Two serious | मानोरा-मंगरुळपीर रस्त्यावर  वाहनाचे टायर फुटल्याने अपघात;  दोन गंभीर 

मानोरा-मंगरुळपीर रस्त्यावर  वाहनाचे टायर फुटल्याने अपघात;  दोन गंभीर 

ठळक मुद्दे घटना २ एप्रिल रोजी सकाळी १०वाजताच्या दरम्यान घडली.गाडी रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडावर जावून आदळली.जखमींना तातडीने मानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

मानोरा : मानोरा-मंगरुळपीर रस्त्यावर संत वामन महाराज सेवाश्रमानजिक स्विफ्ट डिझायर गाडीचे टायर फुटल्याने गाडीने झाडाला धडक दिली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना २ एप्रिल रोजी सकाळी १०वाजताच्या दरम्यान घडली.

पोहरादेवी येथील रहिवासी अर्जुन पालकुतवार वय २७ व अंकुश देशमुख रा. दिग्रस वय ४० हे सकाळी १० वाजताच्या दरम्यान अकोला येथे जात असतांना त्यांच्या एम.एच. २९ आर. ७२२७ या गाडीचे समोरील टायर फुटले. गाडी रस्त्याच्या बाजुला असलेल्या झाडावर जावून आदळली. त्यामध्ये गाडीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून दोघेही जखमी झाले. जखमींना तातडीने मानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पाठविण्यात आले आहे.

Web Title: Accident on Manora-Mangrulpir road; Two serious