Accident: वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, मंगरुळपीर येथील घटना, आरोपी वाहनचालकावर गुन्हा
By नंदकिशोर नारे | Updated: September 29, 2022 16:27 IST2022-09-29T16:27:00+5:302022-09-29T16:27:12+5:30
Accident: चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगरुळपीर तालुक्यातील कोळंबी फाट्याजवळ बुधवारी २८ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.

Accident: वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, मंगरुळपीर येथील घटना, आरोपी वाहनचालकावर गुन्हा
- नंदकिशोर नारे
वाशिम : चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगरुळपीर तालुक्यातील कोळंबी फाट्याजवळ बुधवारी २८ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी रमजान खन्नु कलरवाले रा कोळंबी ने तक्रार दिली की, बुधवारी २८ सप्टेंबर फिर्यादीचा लहान भाऊ इरफान कलरवाले (वय २६ वर्षे) रा. कोळंबी हा त्याच्या एम एच ३०, के ०३९४ क्रमांकाच्या दुचाकीने भंगार विकत घेण्याचे काम आटोपून जोगलदरी येथून कोळंबीकडे घरी परत येत असताना कोळंबीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर विरुध्द दिशेने येत असलेल्या एम.एच. २८, ए झेड ३९०७ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीने चालवून फिर्यादीच्या भावाच्या दुचाकीला धडक दिली. त्यात फिर्यादीचा भाऊ गंभीर जखमी झाला. त्यास ग्रामीण रूग्णालय मंगरूळपीर येथे आणले असता, वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषीत केले. त्यामुळे आपल्या भावाच्या मृत्यूस संबंधित चारचाकी वाहनचालक कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे, या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित चारचाकी वाहन चालकावर कलम २७९,३०४ अ भादवी व कलम १८४ मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.