कार-दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर
By संतोष वानखडे | Updated: April 9, 2024 18:15 IST2024-04-09T18:14:44+5:302024-04-09T18:15:36+5:30
कार व दुचाकीची धडक हाेऊन घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

कार-दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर
संतोष वानखडे, वाशिम : कार व दुचाकीची धडक हाेऊन घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना ९ एप्रिल रोजी दुपारी ३:३० वाजताच्या दरम्यान कारंजा-मूर्तिजापूर मार्गावरील चंदनवाडी जवळ घडली. प्रज्वल मोहोड (२८ वर्षे), असे जखमीचे नाव आहे. तो कारंजा तालुक्यातील सोमठाणा येथील रहिवाशी आहे.
प्राप्त माहितीनुसार अपघातातील जखमी दुचाकी चालक प्रज्वल मोहोड हा एम. एच. ३७ एस. ११५२ क्रमांकाच्या दुचाकीने शहरातून बाहेर जात असताना विरुद्धदिशेने येणाऱ्या एम. एच. २७ डी. ६७३२ क्रमांकाच्या कारने त्याच्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली. त्यामुळे हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक अजय घोडेस्वार यांनी जखमीला प्राथमिक उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; परंतु जखमीची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी बाहेरगावी हलविण्याचा सल्ला रुग्णालय प्रशासनाने दिला.