हराळमध्ये दरोडा; गळ्याला चाकू लावून लुटले!

By सचिन काकडे | Updated: May 3, 2024 19:38 IST2024-05-03T19:37:53+5:302024-05-03T19:38:12+5:30

पहाटे ३ वाजताचा थरार : कुटुंबातील महिलेस मारहाण

A robbery in Hara Robbed with a knife | हराळमध्ये दरोडा; गळ्याला चाकू लावून लुटले!

हराळमध्ये दरोडा; गळ्याला चाकू लावून लुटले!

वाशिम : रिसोड तालुक्यातील हराळ येथे ३ मे रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास चोरट्यांनी एका घरावर धाडसी दरोडा घातला. गळ्याला चाकू लावून ६५ वर्षीय महिलेस लुटण्यासह कुटूंबातील अन्य एका महिलेस मारहाण करून ६० हजार रुपये किंमतीचे सोने-चांदिचे दागिने घेवून चोरट्यांनी तेथून पोबारा केला. या घटनेमुळे हराळ येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शोभा मधुकर कळासरे (६०) यांनी रिसोड पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, ३ मे रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास झोपेत असताना आवाज आल्याने उठून पाहिले असता, तीन अनोळखी इसम समोर उभे असल्याचे दिसले. त्यातील एकाने जवळ येत आरडाओरड केल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच गळ्याला चाकू लावून ३० तोळे वजनाच्या चांदीच्या पाटल्या काढून घेतल्या. त्यानंतर हाॅलमध्ये झोपून असलेली लहान सून पुजा कळासरे हिला त्यांनी मारहाण करून कपाटातील ६० हजार रुपये किंमतीचे दागिने घेवून पोबारा केला. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर भादंविचे कलम ३९२, ३९४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. श्वान पथकास पाचारण करून पोलिसांकडून घटनास्थळ व परिसरात तपासकार्य राबविण्यात आले. मात्र, फार काही निष्पन्न झाले नसल्याची माहिती प्राप्त झाली.

Web Title: A robbery in Hara Robbed with a knife

टॅग्स :washimवाशिम