मंगरूळपीर पालिकेच्या कर विभागात लागली आग

By संतोष वानखडे | Updated: May 8, 2023 19:38 IST2023-05-08T19:37:10+5:302023-05-08T19:38:07+5:30

मंगरूळपीर : मंगरूळपीर नगर पालिकेच्या कर विभागात आग लागून महत्त्वाचे दस्तऐवज जळून खाक झाल्याची घटना ८ मे रोजी दुपारी ...

A fire broke out in the tax department of Mangrulpir Municipality | मंगरूळपीर पालिकेच्या कर विभागात लागली आग

मंगरूळपीर पालिकेच्या कर विभागात लागली आग

मंगरूळपीर : मंगरूळपीर नगर पालिकेच्या कर विभागात आग लागून महत्त्वाचे दस्तऐवज जळून खाक झाल्याची घटना ८ मे रोजी दुपारी ३ वाजताचे दरम्यान घडली.

प्राप्त माहितीनुसार, मंगरूळपीर नगर पालिकेच्या कर विभागात अचानक आग लागून यामध्ये दस्तऐवज जळाले. घटनेनंतर पालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझविली. महत्वाचे दस्तऐवज असलेल्या या विभागाला ही आग नेमकी कशामुळे लागली याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.

आग लागल्यानंतर पालिकेत ठेवण्यात आलेले अग्निरोधक बंब चालविणे न जमल्याने अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत थांबावे लागले. त्यामुळे आग लवकर आटोक्यात आली नाही. या घटनेची शहरात चांगलीच चर्चा रंगत असून आगीचे कारण गुलदस्त्यात आहे. वृत्त लिहेपर्यंत या घटनेची पोलिसांत नोंद करण्यात आली नव्हती.

Web Title: A fire broke out in the tax department of Mangrulpir Municipality