शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शेतशिवारात लागली आग, पाच एकरातील गहू भस्मसात; किन्ही रोकडे येथील घटना

By सुनील काकडे | Updated: March 15, 2024 16:56 IST

गहू काढणीच्या अवस्थेत असताना गुरूवारी रात्री शेतात असलेल्या महावितरणच्या डी.पी.वर शॉर्टसर्किट झाले आणि...

वाशिम : कारंजा तालुक्यातील किन्ही रोकडे शेतशिवारात १४ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागून पाच एकरातील गहू भस्मसात झाला. त्यात संबंधित शेतकऱ्याचे तीन लाखांचे नुकसान झाले. ही घटना शाॅर्ट शर्किटमुळे घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, किन्ही रोकडे शेतशवारात सर्वे नंबर ५८/१ मध्ये शेखर नामदेव येवतकर व अक्षय नामदेव येवतकर या दोघा भावंडांची शेती आहे. त्यात त्यांनी पाच एकरावर यंदा गव्हाची पेरणी केली होती. गहू काढणीच्या अवस्थेत असताना गुरूवारी रात्री शेतात असलेल्या महावितरणच्या डी.पी.वर शॉर्टसर्किट झाले आणि त्याची ठिणगी गव्हात पडल्याने गहू पेटला.

पाच एकरातून येवतकर बंधूंना सुमारे १२५ क्विंटल गहू उत्पन्नाची अपेक्षा होती. परंतु संपूर्ण गहू आगीत भस्मसात झाल्याने मोठे नुकसान झाले. तलाठी चिकटे यांनी पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयाकडे सादर केला. तसेच नुकसान भरपाईसाठी शेखर येवतकर व अक्षय येवतकर यांनी महावितरणकडे तक्रार दाखल केली आहे.किन्ही रोकडे शिवारात आग लागून पाच एकरातील गहू जळाला. ही घटना महावितरणच्या डी.पी.वर शॉर्टसर्किट झाल्याने घडल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. तशी माहिती वरिष्ठांना कळविली असून घटनेचा तपास होवून तसा अहवाल सादर केला जाईल, असं धर्मेंद्र राजपूत, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, कारंजा म्हणाले. 

टॅग्स :Karanjaकारंजाfireआग