शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ९५ प्रकल्प तहानलेलेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 15:38 IST

१३१ धरणांपैकी निम्म्या धरणांत शुन्य टक्केही उपयुक्त जलसाठा झाला नसून, त्यातील १८ धरणे कोरडीच आहेत, तर ९५ प्रकल्पात मृतसाठाच आहे.

ठळक मुद्दे मि. मी. चा विचार करता यंदा ८९ मि. मी. पावसाची तुट सद्यस्थितीत निर्माण झाली आहे.१८ प्रकल्प अद्याप पूर्णपणे कोरडेच आहेत, तर तीन मध्यम प्रकल्पांपैकी सोनल प्रकल्पासह ७७ प्रकल्पांत मृतसाठाच आहे.जुन महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्हाभरात ६४ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७९८.७० मि.मी. पाऊस अपेक्षीत असताना जुलै महिना अर्धा उलटला तरी, केवळ १९.३३ टक्केच पाऊस पडला आहे. त्यात १३१ धरणांपैकी निम्म्या धरणांत शुन्य टक्केही उपयुक्त जलसाठा झाला नसून, त्यातील १८ धरणे कोरडीच आहेत, तर ९५ प्रकल्पात मृतसाठाच आहे. त्यामुळेच जिल्ह्यात अद्यापही १५७ गावांत पाणीटंचाईची समस्या कायमच आहे. पावसाच्या सरासरीत वाढ न झाल्यास यंदा हिवाळ्यापासूनच जनतेला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात जुन ते सप्टेंबरदरम्यान वार्षिक सरासरी ७९८.७० मि. मी. पावसाची नोंद होते. गतवर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ९६ टक्के पावसाची नोंद झाली होती. त्यामुळेच जिल्ह्यातील ३२१ गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. आता यंदा मान्सूनला विलंब झाल्याने पावसाच्या सरासरीवर मोठा परिणाम झाला. जिल्ह्यात १ जुन ते १० जुलैदरम्यान २४७.१८ मि. मी. अपेक्षीत असताना गतवर्षी याच कालावधित ३२५.५५ मि. मी. पाऊस पडला, तर यंदा याच कालावधित १५८.४३ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. अर्थात मि. मी. चा विचार करता यंदा ८९ मि. मी. पावसाची तुट सद्यस्थितीत निर्माण झाली आहे. यामुळेच जिल्ह्यातील १८ प्रकल्प अद्याप पूर्णपणे कोरडेच आहेत, तर तीन मध्यम प्रकल्पांपैकी सोनल प्रकल्पासह ७७ प्रकल्पांत मृतसाठाच आहे. गतवर्षी अर्ध्या हिवाळ्यानंतर जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या उद्भवू लागली होती. अगदी जुन महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्हाभरात ६४ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता, तर ३८२ विहिरींचे अधीग्रहण करण्यात आले होते. जुलै महिन्याच्या सुरुवातीला यातील २७ टँकर बंद झाले, तर २३७ अधिग्रहित विहिरी बंद करण्यात आल्या. तथापि, अद्यापही ३७ गावांना ३८ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असून, १४५ अधिग्रहित विहिरीतून ११९ गावांची तहान भागविण्यात येत आहे. वाशिम तालुक्याची स्थिती समाधानकारकजिल्ह्यातील इतर पाच तालुक्यांच्या तुलनेत यंदा वाशिम तालुक्यातील पावसाची सरासरी अधिक आहे. तालुक्यात १ जुन ते १० जुलैदरम्यान २२,६३ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळेच विहिरी, कूपनलिकांची पाणी पातळी थोडी सुधारल्याने या तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांत सुरू केलेले सर्व टँकर बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, कारंजा तालुक्यात किती उपाय योजनांना मुदतवाढ दिली. त्याचा अंतिम अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.

टॅग्स :washimवाशिमDamधरणRainपाऊस