वाशिम जिल्ह्यात विहिर अधिग्रहण व टँकरसाठीच्या ८८ लाखांच्या निधीचे वाटप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 13:36 IST2018-03-13T13:36:49+5:302018-03-13T13:36:49+5:30

वाशिम : सन २०१६-१७ मधील पाणीटंचाई निवारणार्थ केलेल्या उपाययोजनेचा निधी टँकर चालक व खासगी विहिर मालकांना पंचायत समिती स्तरावरून वितरित करण्यात आला.

88 million rupees allocated for in Washim district! | वाशिम जिल्ह्यात विहिर अधिग्रहण व टँकरसाठीच्या ८८ लाखांच्या निधीचे वाटप !

वाशिम जिल्ह्यात विहिर अधिग्रहण व टँकरसाठीच्या ८८ लाखांच्या निधीचे वाटप !

ठळक मुद्देपाणीटंचाईची तिव्रता कमी करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा तसेच खासगी विहिरींचे अधिग्रहण केले होते. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ६ जानेवारी २०१८ रोजी एकूण ८७ लाख ९१ हजार रुपयांचा निधी सहाही पंचायत समित्यांना वितरित केला. पडताळणी केल्यानंतर संबंधित विहिर मालक तसेच टँकर मालकाच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे.

वाशिम : सन २०१६-१७ मधील पाणीटंचाई निवारणार्थ केलेल्या उपाययोजनेचा निधी टँकर चालक व खासगी विहिर मालकांना पंचायत समिती स्तरावरून वितरित करण्यात आला. जवळपास ८७.९१ लाख रुपये संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले.

गतवर्षी जवळपास २५० गावांत पाणीटंचाई निर्माण झाली होती. या गावांतील पाणीटंचाईची तिव्रता कमी करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा तसेच खासगी विहिरींचे अधिग्रहण केले होते. त्यापोटी ८७.९१ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता होती. वारंवार मागणी करूनही टँकर चालक व विहिर मालकांना निधी मिळत नव्हता. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. २०१७ मध्ये डिसेंबर महिन्यात शासनाकडून जिल्हा प्रशासनाला निधी प्राप्त झाला होता. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ६ जानेवारी २०१८ रोजी एकूण ८७ लाख ९१ हजार रुपयांचा निधी सहाही पंचायत समित्यांना वितरित केला. टँकर चालक तसेच विहिर मालकांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरून बँक खाते व आधार क्रमांक मागविण्यात आले होते. पडताळणी केल्यानंतर संबंधित विहिर मालक तसेच टँकर मालकाच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. वाशिम तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी २.५७ लाख तर खाजगी विहिरसाठी १४.३१ लाख रुपये संबंधितांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आले. मालेगाव तालुक्यात टँकरसाठी १२.३१ लाख तर खाजगी विहिरसाठी १२.५५ लाख रुपये, मंगरूळपीर तालुक्यात टँकरसाठी २.७० लाख तर विहिर अधिग्रहणसाठी १.२६ लाख रुपये, मानोरा तालुक्यात टँकरसाठी ४.५६ लाख तर खाजगी विहिरसाठी ९५ हजार रुपये, रिसोड तालुक्यात खासगी विहिरसाठी २३.४९ लाख रुपये आणि कारंजा तालुक्यात टँकरसाठी ९.०३ लाख तर खाजगी विहीर अधिग्रहणासाठी ४.५० लाख रुपये संबंधित विहिर मालक तसेच टँकर मालकाच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली.

Web Title: 88 million rupees allocated for in Washim district!