वाशिम जिल्ह्यात आणखी ८ कोरोना पाॅझिटिव्ह; २८ जणांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 12:31 IST2020-11-04T12:31:23+5:302020-11-04T12:31:37+5:30

Washim coronavirus news आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५७२६ वर पोहचली आहे.

8 more corona positive in Washim district; Discharge of 28 persons | वाशिम जिल्ह्यात आणखी ८ कोरोना पाॅझिटिव्ह; २८ जणांना डिस्चार्ज

वाशिम जिल्ह्यात आणखी ८ कोरोना पाॅझिटिव्ह; २८ जणांना डिस्चार्ज

 लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  जिल्ह्यात आणखी ८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे मंगळवारी निष्पन्न झाले. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५७२६ वर पोहचली आहे. दरम्यान मंगळवारी २८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
नोव्हेंबर महिन्यातही कोरोनाचा आलेख घसरल्याचे तीन दिवसातील अहवालावरून दिसून येते. गत दोन दिवसात कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू नसल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला. मंगळवारी जिल्ह्यात ८ जण कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये रिसोड शहरातील रामनगर येथील १, हराळ येथील २, कारंजा लाड शहरातील गांधी चौक येथील २, उंबर्डाबाजार येथील ३ अशा ८ जणांचा समावेश आहे.  मंगळवारी वाशिम शहरासह तालुक्यातील एकही जण कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आला नाही, ही बाब शहरवासियांसाठी दिलासादायक ठरली. दरम्यान,  मंगळवारी २८ जणांनी कोरोनावर मात केली. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५७२६ वर पोहचली आहे. यापैकी ५२०६ जण बरे झाले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रा सर्वेक्षण करण्यात येत आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: 8 more corona positive in Washim district; Discharge of 28 persons