संजय गांधी निराधार योजनेची ७८ प्रकरणे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 07:32 PM2018-07-26T19:32:03+5:302018-07-26T19:32:06+5:30

तहसील कार्यालयात गुरूवारी पार पडलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या सभेत योजनांतर्गत दाखल ७८ प्रकरणे मंजूर करण्यात आली;

78 cases of Sanjay Gandhi Niradhar scheme sanctioned | संजय गांधी निराधार योजनेची ७८ प्रकरणे मंजूर

संजय गांधी निराधार योजनेची ७८ प्रकरणे मंजूर

Next

मालेगाव (वाशिम) : येथील तहसील कार्यालयात गुरूवारी पार पडलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या सभेत योजनांतर्गत दाखल ७८ प्रकरणे मंजूर करण्यात आली; तर २१ प्रकरणांमध्ये त्रुटी आढळल्याने त्यावर निर्णय झाला नाही, अशी माहिती समितीचे तालुकाध्यक्ष मारोतराव लादे यांनी दिली. 
संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दिव्यांगांची २२ प्रकरणे दाखल झाली होती. याशिवाय विधवा ४, श्रावणबाळ वृद्धपकाळ २६, दारिद्रयरेषेखालील ४७ अशी ९९ प्रकरणे दाखल झाली होती. त्यापैकी ७८ प्रकरणे निकाली काढण्यात आली; तर उर्वरित प्रकरणांमध्ये त्रुटी आढळल्याने सदर प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली. दरम्यान, ज्या लाभार्थ्यांचे अर्ज त्रुटीमध्ये आहेत, त्यांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून प्रकरणे पुन्हा दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले. या सभेला मारोतराव लादे यांच्यासह तहसीलदार राजेश वजीरे, सदस्य अमोल माकोडे, संगिता राउत, नितीन काळे, दीपक दहात्रे, संजय केकन, सुनील घुगे, ज्ञानेश्वर मुंढे, साहेबराव नवघरे, डॉ. गजानन ढवळे, व्ही.जी. मारवाडी, एस.ए. ठोकळ, सी.बी. इंगोले उपस्थित होते.  पुढील सभा ५ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली असून परिपूर्ण अर्ज सादर करण्याची मुदत 25 आॅगस्ट असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Web Title: 78 cases of Sanjay Gandhi Niradhar scheme sanctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.