शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत ७६.६२ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:45 IST

रिसोड : तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारीला मतदान शांततापूर्ण वातावरणात निवडणूक पार पडली. सकाळपासूनच विविध मतदान केंद्रावर मतदारांची रांगा ...

रिसोड : तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारीला मतदान शांततापूर्ण वातावरणात निवडणूक पार पडली. सकाळपासूनच विविध मतदान केंद्रावर मतदारांची रांगा लागणे सुरू झाले होते. या दरम्यान मतदारांत चांगलाच उत्साह दिसून आला. यावेंळी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच धावपळ दिसून आली. मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.

सुरुवातीला रिसोड तालुक्यातील ३४ ग्रामपंचायती करिता मतदानाची घोषणा झाली होती.मात्र तालुक्‍यातील मोप व कंकरवाडी या ग्रामपंचायती अविरोध झाल्याने ३२ ग्रामपंचायती करिता आज मतदान झाले. मतदान करणाऱ्या मध्ये वयोवृद्ध मतदार पासून युवका पर्यंत चांगलाच उत्साह दिसून आला. वयोवृद्ध मतदारांना युवकांनी उचलून मतदान केंद्रापर्यंत पोहोचले तर अपंगांना व्हीलचेअरवर बसून मतदान करण्यासाठी केंद्रापर्यंत सोडण्यात आले. आमदार अमित झनक यांनी आपले मूळगाव मांगुळ झनक येथे आपल्या मतदानाचा अधिकार बजावला तर जिल्हा परिषद सदस्य, पंचायू समिती सदस्य, खरेदी-विक्री संघाचे सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य यांनी आपापल्या गावी मतदानाचा हक्क बजावला यावेळी झालेली ही निवडणूक खूपच रंगतदार झाली असल्याची चर्चा मतदारांमध्ये दिसून आली. तालुक्यातील नावली,नंधाना, गोभणी,मांगुळ झनक, नेतन्सा, कवठा, खू , चिखली, चिचांबा पेन, गोवर्धन, केशवनगर, शेलु खडसे,लोणी बू, चिचांबा भर,मसलापेन,सवड, करडा,केनवड, बिबखेड, पळसखेड, आगरवाडी, वाकद, मोठेगाव, गौंढाळा, ऐकलासपुर,खडकी सदार, येवती, रिठद,व्याड, करंजी, वनोजा, देऊळगाव बंडा, हराळ, या गावात निवडणूक झाली. काही ठिकाणी किरकोळ वाद सोडता निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.