शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

६५ टक्के कामगार अशिक्षितच!

By admin | Updated: September 16, 2014 18:46 IST

नोंदणी युद्धपातळीवर

वाशिम : जिल्ह्यात इमारत व इतर बांधकाम तसेच घरेलू कामगारांची संख्या साडेसहा हजार असून, त्यापैकी ६५ टक्के कामगार अशिक्षितच असल्याची माहिती समोर आली आहे.असंघटित कामगारांत मोडणार्‍या या कामगारांवर अन्याय होऊ नये, त्यांना संघटितपणे शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याची सोय व्हावी म्हणून शासनाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर कामगार कार्यालय वा पर्यायी व्यवस्थेच्या माध्यमातून असंघटित अशा घरेलु कामगार व इमारत वा इतर बांधकाम करणार्‍या नोंदणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. दोन्ही प्रवर्गात महिला व पुरुषांची नोंदणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. आजतागायत वाशिम जिल्ह्यात इमारत व इतर बांधकामातील ११६२ तर घरेलु कामगारांची ५१९७ मिळून ६ हजार ३५९ कामगारांची नोंद करण्यात आली आहे. नोंदणी झालेल्या इमारत व इतर बांधकामातील कामगारांना घरेलु वस्तूसांठी तीन हजाराचे अर्थसहाय्य दिल्या जाते. घरेलु कामगाराची नोंदणी झाल्यानंतर त्याला वयाच्या पाच वर्षांनंतर सन्मानधन योजनेंतर्गत १0 हजाराचे अर्थसहाय्य दिले जाते. त्या कामगाराला जोडीदारासह विमा संरक्षण, महिला असल्यास दोन प्रसूतींपर्यंत १0 हजाराचे अर्थसहाय्य, कामगाराच्या पाल्याची शिकत असलेल्या शाळेत ७५ टक्के उपस्थिती असल्यास त्याला शिष्यवृत्ती तसेच नोंदणीनंतर कामगाराला अपंगत्व वा मृत्यू आल्यास अर्थसहाय्याची सोयही शासनाने केली आहे. वाशिम शहरासह संपूर्ण जिल्हय़ामध्ये दुकाने, व्यापारी संस्था, लॉजिंग, हॉटेल्स सिनेमा थियेटर नाट्यगृह या अंतर्गत एकूण १ हजार ११४ संस्था तसेच सदर संस्थांमध्ये एकूण ३ हजार २२ कामगार असल्याची अधिकृत नोंदणी आहे. या शिवाय कामगार नसलेल्या एकूण पाच हजार ९७१ संस्थाचीसुद्धा अधिकृत नोंद झालेली आहे. वाशिममध्ये ५४३ दुकानांमध्ये ८४0 कामगार, कर्मशियल तसेच बँका व अन्य व्यापारी संस्था असलेल्या ३६३ संस्थांमध्ये १४५ कामगार, १२३ हॉटेल्समध्ये ३४५ कामगार, पाच लॉजींगमध्ये नऊ, चार नाट्यगृह सिनेमा थिएटरमध्ये २१ कामगार प्रत्यक्ष कामावर आहेत. दोन हजार २६६ असलेल्या सर्व संस्थांमध्ये एकही कामगार नाही. कारंजा येथील सर्व ४९३ नोंदणीकृत संस्थांमध्ये ११९२ कामगार तर मंगरुळपीर येथील २६३ संस्थांमध्ये ४७९ कामगारांची नोंद आहे. कारंजा येथील २६९१ व मंगरुळपीर येथील १0२४ दुकाने व संस्थांमध्ये कामगार नसल्याची नोंद आहे. अकोल्याचे कामगार अधिकारी प्रशांत महल्ले यांच्याकडे वाशिम व बुलडाणा जिल्हय़ाचा प्रभार आहे. दुकान व संस्था अधिनियम कार्यालय निरीक्षक आत्माराम धनकर व कारकून खान यांच्यावर कार्यालयाची भिस्त आहे.