वाशिम जिल्ह्यातील ६१ हजार शेतकऱ्यांना मिळाला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 18:28 IST2019-06-25T18:28:06+5:302019-06-25T18:28:11+5:30
आतापर्यंत १ लाख ७ हजार शेतकºयांच्या याद्या अपलोड झाल्या असून ४२ हजार शेतकºयांना प्रथम; तर १९ हजार शेतकºयांच्या बँक खात्यात दुसºया हप्त्याची रक्कम जमा झाली आहे.

वाशिम जिल्ह्यातील ६१ हजार शेतकऱ्यांना मिळाला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळावे, या उद्देशाने केंद्र शासनाकडून हाती घेण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत १ लाख ७ हजार शेतकºयांच्या याद्या अपलोड झाल्या असून ४२ हजार शेतकºयांना प्रथम; तर १९ हजार शेतकºयांच्या बँक खात्यात दुसºया हप्त्याची रक्कम जमा झाली आहे. दरम्यान, आता बदललेल्या निकषामुळे जे शेतकरी अपात्र ठरले होते, त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केंद्र शासनाने आधी दोन हेक्टरपर्यंतच्या शेत जमीनीची मर्यादा ठरवून शेतकºयांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची आखणी केली. याअंतर्गत तीन टप्प्यात प्रत्येकी २ हजार रुपये याप्रमाणे वर्षभरात ६ हजार रुपयांची रक्कम पात्र शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही करण्यात आली. यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या १ लाख ७ हजार शेतकºयांच्या याद्या वेबसाईटवर अपलोड केल्या होत्या. त्यापैकी ४२ हजार शेतकºयांना पहिला आणि १९ हजार शेतकºयांना दुसºया हप्त्याची रक्कमही देण्यात आली. दरम्यान, अडचणीत असलेल्या इतरही शेतकºयांचा आता केंद्र शासनाने विचार करून योजनेची व्याप्ती वाढविली असून ५ हेक्टरपर्यंत शेतजमिन असलेल्या शेतकºयांनाही योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनाने शेतकºयांकडून आॅनलाईन स्वरूपात अर्ज मागविले आहेत. या योजनेची अंमलबजावणी सद्या गतीने केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.