५७ संयुक्त वनव्यवस्थापन समित्या पडल्या बंद!

By Admin | Updated: April 17, 2017 16:32 IST2017-04-17T16:32:49+5:302017-04-17T16:32:49+5:30

जिल्ह्यातील ८६ पैकी ५७ संयुक्त वनव्यवस्थापन समित्या आजमितीस बंद पडल्या आहेत.

57 joint development committees are closed! | ५७ संयुक्त वनव्यवस्थापन समित्या पडल्या बंद!

५७ संयुक्त वनव्यवस्थापन समित्या पडल्या बंद!

वाशिम : वन संपत्तीची सुरक्षा करा व मिळणारा नफा वाटून घ्या, हे सूत्र अंगीकारून कधीकाळी उदयास आलेल्या जिल्ह्यातील ८६ पैकी ५७ संयुक्त वनव्यवस्थापन समित्या आजमितीस बंद पडल्या आहेत. परिणामी, वनाच्छादित ५८ हजार ५८९ हेक्टर क्षेत्राच्या सुरक्षेचा मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे. 
वनपरिक्षेत्रातील गावांचा सर्वांगीण विकास व पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या मूळ उद्देशातून सन २००३ पासून महाराष्ट्र शासनाने संयुक्त वनव्यवस्थापन समित्या गठीत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, वाशिम जिल्ह्यात ८६ समित्यांचे गठीण करण्यात आले. त्यात वाशिम-रिसोड २२, मालेगाव १७, कारंजा-मंगरूळपीर १६ आणि मानोरा वनपरिक्षेत्रात ३१ समित्या कार्यान्वित करण्यात आल्या. मात्र, आजमितीस यातील केवळ २९ समित्याच कार्यान्वित असून उर्वरित ५७ समित्यांचे कामकाज पूर्णत: थांबले आहे. 

Web Title: 57 joint development committees are closed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.