शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयासाठी पाच हजारांचा अतिरिक्त निधी!

By admin | Updated: December 18, 2015 02:33 IST

३0२ लाभार्थ्यांंना अनुदान वाटप.

शीतल धांडे / रिसोड : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शासनाकडून शौचालय उभारण्याकरिता लाभार्थ्यांंना मिळणारा १२ हजार रुपयांचा निधी मुळातच कमी पडत असल्याची बाब लक्षात घेऊन स्थानिक नगर परिषदेने लाभार्थ्यांंना अतिरिक्त पाच हजार रुपयांचे अनुदान देण्याचा ठराव पारित केला. त्यानुसार, आतापर्यंंत ३0२ लाभार्थ्यांंना २५ लाख ६७ हजार रुपये अनुदानदेखील वितरित करण्यात आले आहे. नगर परिषदेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, सध्या २ हजार २५४ नागरिकांकडे वैयक्तिक शौचालय नसल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, शहरी भागात शौचालय उभारण्याकरिता केंद्र व राज्य शासनाकडून सहा हजार याप्रमाणे १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते; मात्र एवढय़ा कमी पैशात शौचालयाचे बांधकाम पूर्ण होत नसल्याने योजनेत सहभागी होणार्‍या लाभार्थ्यांंंमध्ये निरुत्साह होता. ही बाब लक्षात घेऊन जिल्हय़ातील चारही नगर परिषदांनी सर्वसाधारण फंडातून लाभार्थ्यांंना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे निर्देश शासनस्तरावरून देण्यात आले. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून, चारही नगर परिषदांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील वैयक्तिक शौचालय नसणार्‍या लाभार्थ्यांंंच्या याद्या तयार केल्या आहेत. अर्जानुसार लाभार्थ्यांंंना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासही प्रारंभ करण्यात आला आहे. या प्रक्रियेत सध्या तरी रिसोड नगर परिषद अग्रक्रमावर असल्याचे दिसून येत आहे. रिसोड पालिकेने १ हजार ८११ लाभार्थ्यांंंचे अर्ज ह्यऑनलाइन अपलोडह्ण केले असून, त्यापैकी ३५0 लाभार्थ्यांंंचे ह्यस्पॉट व्हेरीफिकेशनह्णची प्रक्रिया पार पडली आहे. यातील ४८ लाभार्थ्यांंंच्या बाबतीत किरकोळ त्रुटी आढळल्या असून, उर्वरित ३0२ लाभार्थ्यांंंना विनाविलंब एकंदरित अनुदानाच्या ५0 टक्के अर्थात ८ हजार ५00 रुपये याप्रमाणे २५ लाख ६७ हजार रुपयांच्या पहिल्या हप्त्याची रक्कम लाभार्थ्यांंंच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. यामुळे सध्या रिसोड शहरात १0 शौचालयांचे काम पूर्ण झाले असून, इतर ठिकाणी शौचालय उभारणीच्या कामाने वेग घेतल्याचे दिसून येत आहे.