शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
5
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
6
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
7
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
8
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
9
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
10
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
11
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
12
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
13
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
14
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
15
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
16
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
17
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
18
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
19
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
20
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
Daily Top 2Weekly Top 5

४७ टक्के शेतकरी आत्महत्या मदतीसाठी अपात्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:29 IST

वाशिम : सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व अन्य कारणांमुळे गत पाच वर्षांत जिल्ह्यातील ४४० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यापैकी २२९ ...

वाशिम : सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व अन्य कारणांमुळे गत पाच वर्षांत जिल्ह्यातील ४४० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. यापैकी २२९ आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र ठरल्या, तर ४७ टक्के अर्थात २०१ आत्महत्या अपात्र ठरल्या असून, चालू वर्षातील १० प्रकरणे चौकशीत आहेत.

शेतकऱ्यांना नानाविध संकटांना सामोरे जावे लागते. नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झाल्यास कर्जाचा भरणा कसा करावा, या चिंतेने अनेक शेतकऱ्यांची झोप उडते. यातून काही शेतकरी मृत्यूला जवळ करतात, तर काही शेतकरी पर्यायी व्यवस्था शोधून या संकटावर मात करतात. २०१६ ते २०२० या पाच वर्षांत जिल्ह्यात ४४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद जिल्हा प्रशासनाच्या दप्तरी आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदतीचा हात मिळावा, याकरिता सरकारकडून एक लाख रुपयांची मदत केली जाते. मात्र, याकरिता आत्महत्येमागे कर्जबाजारीपणा, बँकांचा तगादा, नापिकी यांसारखी कारणे असावी लागतात. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काम करणारी समिती हे प्रकरण मदतीसाठी मंजूर होणार की नामंजूर, याबाबतचा निर्णय घेते. गत पाच वर्षात ४४० पैकी २२९ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली, तर २०१ प्रकरणे अपात्र ठरली. २०२० मधील १० प्रकरणे चौकशीत आहेत.

०००००

ही कारणे असतील, तरच मिळते मदत!

शेतीसाठी घेतलेले कर्ज परत फेडता न येणे, हे कर्ज फेडण्यासाठी बँकांकडून तगादा लावला जाणे, गेली काही वर्षे शेतीमध्ये काहीच न पिकणे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेली पिके गमावून बसणे यांसारख्या कारणांनी शेतकऱ्याने आत्महत्या केली, तर अशा पीडित शेतकऱ्याच्या कुटुंबाला सरकारकडून एक लाख रुपयांची मदत दिली जाते.

००००

चालू वर्षात १० प्रकरणे चौकशीत

२०२० या वर्षात ९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी ३० आत्महत्यांची प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरली, तर ५२ प्रकरणांत नापिकी, कर्जबाजारीपणा, नैसर्गिक आपत्ती आदी कारणे आढळून आली नसल्याने ही प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली. उर्वरित १० प्रकरणे चौकशीत आहेत.

०००००

वर्षेपात्रअपात्र एकूण

२०१६ ५४ ३२ ८६

२०१७ ४१ ३१ ७२

२०१८ ५५ ४३ ९८

२०१९ ४९ ४३ ९२

२०२० ३० ५२ ८२

एकूण २२९ २०१ ४३०