शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

‘काठी’ मिरवणुकीची ३०० वर्षांची परंपरा कायम!

By admin | Updated: April 10, 2017 01:36 IST

राजुरा : सुदी येथे पाडव्याच्या मुहूर्तावर उभारलेल्या ‘काठी’ची शनिवारी सायंकाळी ग्रामस्थांच्यावतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली.

राजुरा : सुदी येथे पाडव्याच्या मुहूर्तावर उभारलेल्या ‘काठी’ची शनिवारी सायंकाळी ग्रामस्थांच्यावतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. जवळजवळ ३०० वर्ष जुनी परंपरा आजही गावकऱ्यांनी मनोभावे जपली आहे.मालेगाव तालुक्यातील सुदी हे गाव जवळपास १५०० लोकवस्तीचे असून, पुुरातन काळापासून भगवान सिद्धेश्वरांना येथील नागरिक कुलदैवत मानतात. गावाच्या मध्यभागी व गाव कुसालगत असे सिद्धेश्वराचे वेगळे दोन मंदिर असून, गावाच्या मध्यभागी असलेल्या मंदिरात पंचधातूची पंचभूमी महादेवाची मूर्ती आहे. मंदिरावर गुढीपाडव्याचे दिवशी गत ३०० वर्षांपासून ‘काठी’ उभारली जाते. तिला ‘गुंडा’ असेही संबोधले जाते. पाच दिवस काठीची भक्तीभावे पूजा-अर्चानंतर पंचमीच्या दिवशी काठीची ढोल-ताशांच्या गजरात गावभर मिरवणूक काढली जाते. यावेळी अनेकजण हातावर, खांद्यावर व डोक्यावर काठीचा तोल सांभाळत ‘काठी’ला नाचवितात. सुदी येथील काठीची मिरवणूक पंचक्रोशीत प्रसिद्ध असून, या मिरवणुकीत आबालवृद्धांसह महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होतात. काठी हे माता पार्वतीचे रूप मानल्या जात असल्याचे येथील वयोवृद्ध भाविक सांगतात. यावेळी मंदिरावरसुद्धा भव्य यात्रा महोत्सव व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. बाहेरगावी रोजगारासाठी गेलेले अथवा स्थायिक झालेले नागरिकसुद्धा या दिवशी गावात आवर्जुन हजेरी लावतात. शनिवार, ८ एप्रिल रोजी गावातून ‘काठी’ची मिरवणूक काढण्यात आली. तत्पूर्वी सिद्धेश्वर मंदिरावर काठीचे विधिवत पूजन केले.