३०० विद्यार्थ्यांनी दिली होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 03:45 PM2019-10-06T15:45:39+5:302019-10-06T15:45:54+5:30

इयत्ता सहावीचे ११९ व इयत्ता नववीचे १८१ अशा एकूण ३०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

300 students have given the Homibabha science Examination | ३०० विद्यार्थ्यांनी दिली होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षा

३०० विद्यार्थ्यांनी दिली होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षा

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाद्वारे डॉ होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षा एसएमसी इंग्लिश स्कूल वाशिम येथे झाली असून, ३०० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
डॉ होमिभाभा परीक्षा हि विद्यार्थ्यांसाठी जेईई अँडव्हान्स व नीट परीक्षेची पूर्व तयारीच ठरते. सदर परीक्षा मंडळाच्यावतीने इयत्ता सहावी व नववीतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येते. या परीक्षेला वाशिम जिल्ह्यातून विविध शाळेतून ३१३ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी इयत्ता सहावीचे ११९ व इयत्ता नववीचे १८१ अशा एकूण ३०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेसाठी डॉ होमीभाभा बालवैज्ञानिक परिक्षा मंडळाचे बहिस्थ केंद्र समन्वयक म्हणुनभिमा गभाले ,केंद्रप्रमुख प्राचार्य मीना उबगडे व केंद्र संचालक म्हणुन अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी काम पाहिले. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षिका वर्षा पाटील, ऋतुजा शिवाल, श्यामल शर्मा, अर्चना कासट, मनिषा रामवानी, मोनिका भोयर, निकिता वाठोरे, जी .बी.खंडारे व सेवक बाळू मुर्हकर यांनी सहकार्य केले.

Web Title: 300 students have given the Homibabha science Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.