मंगरूळपीर तालुक्यातून २४ हजाराचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 18:00 IST2018-09-16T17:59:47+5:302018-09-16T18:00:15+5:30

मंगरूळपीर (वाशिम) : मंगरूळपीर तालुक्यातील सायखेडा ते मोतसावंगा या मार्गावर २४ हजार रुपये किंमतीच्या गुटख्यासह ३५ हजार रुपये किंमतीची दुचाकी मंगरूळपीर पोलिसांनी १५ सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास जप्त केली.

24 thousand gutka seized from Mangrulpir taluka | मंगरूळपीर तालुक्यातून २४ हजाराचा गुटखा जप्त

मंगरूळपीर तालुक्यातून २४ हजाराचा गुटखा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर (वाशिम) : मंगरूळपीर तालुक्यातील सायखेडा ते मोतसावंगा या मार्गावर २४ हजार रुपये किंमतीच्या गुटख्यासह ३५ हजार रुपये किंमतीची दुचाकी मंगरूळपीर पोलिसांनी १५ सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास जप्त केली.
१५ सप्टेंबर रोजी अरविंद सोनोने व महादेव सोळंके या पोलीस कर्मचाºयांनी सायखेडा-मोतसावंगा या मार्गावर पंचासमक्ष नाकाबंदी करून आरोपी मनीष भाऊराव गहुले (३७)रा. सायखेडा याचेकडून एम.एच. ३७ एस ३०८७ क्रमांकाच्या दुचाकीवर असलेला दोन कापडी पिशव्यामधील २३ हजार ८९५ रुपयांचा गुटखा व  ३५ हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकूण ५८ हजार ८९५ रुपयांचा माल ताब्यात घेतला. पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषधी प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली, असे मंगरूळपीर पोलिसांनी सांगितले. दरम्यान, अवैध गुटकाप्रकरणी कारवाई होत असतानाही, तालुका गुटक्याची सर्रास विक्री होत असल्याचे दिसून येते. अन्न व औषधी प्रशासन विभागाने कारवाईची मोहिम तिव्र करणेअपेक्षीत आहे.

Web Title: 24 thousand gutka seized from Mangrulpir taluka