शौचालय नसणाऱ्या २१४ कुटूंबाचे रेशन होणार बंद !
By Admin | Updated: July 3, 2017 20:26 IST2017-07-03T20:10:01+5:302017-07-03T20:26:57+5:30
देपूळ : वैयक्तीक शौचालय नसणाऱ्या देपुळ येथील २१४ नागरीकांचे माहे जुलैपासून रेशन व केरोसीन बंद करण्याचा ठराव २३ जून रोजी देपूळ ग्रामपंचायतने घेतला होता. आता त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

शौचालय नसणाऱ्या २१४ कुटूंबाचे रेशन होणार बंद !
लोकमत न्यूज नेटवर्क
देपूळ : वैयक्तीक शौचालय नसणाऱ्या देपुळ येथील २१४ नागरीकांचे माहे जुलैपासून रेशन व केरोसीन बंद करण्याचा ठराव २३ जून रोजी देपूळ ग्रामपंचायतने घेतला होता. आता त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
शासनाचे शौचालयासाठी अनुदान घेवुन शौचालयाचा वापर न करणारे तथा शौचालय पाडून टाकल्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा ठराव २३ जुन रोजी देपुळ ग्रामपंचायतने घेतला होता. या संदर्भात ३५ नागरिकांना नोटीस बजावल्या. येत्या २ आॅक्टोंबर २०१७ पर्यंत देपुळ ग्रामपंचायत हागणदारी मुक्त करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतने े जनजागृती केली. परंतु नागरिकांचा प्रतिसाद समाधानकारक मिळत नसल्याने जुलै २०१७ पासून शौचालय नसलेल्या नागरिकांचा रेशन पुरवठा तथा केरोसीन पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ज्यांनी शौचालयाचे अनुदान घेतले परंतु ते वापर करीत नाहित किंवा ज्यांनी शौचालय पाडून टाकले अशा ३५ नागरिकांना नोटीस देवुन ७ जुलै पर्यंत शौचालय उभारण्याचे सांगितले आहे. या सुचनेचे पालन न करणाऱ्यांच्या विरोधात फौजदार कार्यवाही केली जाईल असे ग्राम पंचायतच्या नोटीसमध्ये म्हटले आहे.