कारंजा तालुक्यातील काजळेश्वर-खेर्डा मार्गावर कार उलटल्याने १७ वर्षीय मुलगा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 15:54 IST2017-12-29T15:51:48+5:302017-12-29T15:54:02+5:30
कारंजा लाड: चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटून घडलेल्या अपघातात १७ वर्षीय मुलगा ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास कारंजा तालुक्यातील काजळेश्वर-खेर्डा मार्गावर उमा नदीच्या पुलानजिक घडली.

कारंजा तालुक्यातील काजळेश्वर-खेर्डा मार्गावर कार उलटल्याने १७ वर्षीय मुलगा ठार
कारंजा लाड: चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटून घडलेल्या अपघातात १७ वर्षीय मुलगा ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास कारंजा तालुक्यातील काजळेश्वर-खेर्डा मार्गावर उमा नदीच्या पुलानजिक घडली. पार्थ मोहन आगे (१७), असे मृतकाचे, तर अभिजित प्रल्हाद सुलताने (३५), क्षीतीज किशोर भड (२४) व श्रेयश अभिजित सुलताने (०४) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.
तालुक्यातील काजळेश्वर येथील महादेव भड यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या सावडण्याच्या कार्यक्रमासाठी घरी आलेल्या काही पाहुण्यांपैकी चालक अभिजित प्रल्हाद सुलताने, क्षीतीज किशोर भड , श्रेयश अभिजित सुलताने आणि पार्थ मोहन आगे, हे चौघे मुलीला आणण्यासाठी एमएच-२७, टी-१३२ क्रमांकाच्या कारने काजळेश्वर येथून कारंजाकडे येत होते. दरम्यान काजळेश्वरनजिक असलेल्या उमा नदीच्या पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार उलटली. या अपघातात पार्थ मोहन आगे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अभिजित प्रल्हाद सुलताने, क्षीतीज किशोर भड, श्रेयश अभिजित सुलताने (०४) हे गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती कळताच सर्वधर्मआपत्कालीन संस्थेचे शाम सवाई व सचिन हाते यांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वृत्त लिहित असेपर्यंत या प्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती.