शेतात काम करताना १६ वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 16:59 IST2019-08-07T16:59:23+5:302019-08-07T16:59:28+5:30
सोयाबिनच्या पिकात निंदणाचे काम करित असताना सोनू ज्ञानेश्वर चव्हाण हीला अचानकपणे सापाने चावा घेतला; मात्र वेळेवर उपचार न मिळाल्याने तीचा मृत्यू झाला.

शेतात काम करताना १६ वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर (वाशिम) : शेतात निंदणाचे काम करित असताना सर्पदंश झाल्याने एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील जोगलदरी येथे बुधवार, ७ आॅगस्ट रोजी घडली. यामुळे अन्य मजूरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
गत काही दिवसांपासून दमदार पाऊस सुरू असून खरीपातील पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात तण वाढले आहे. ते काढण्याची लगबग सद्या सुरू आहे. दरम्यान, जोगलदरी येथील हरीश्चंद्र चव्हाण यांच्या शेतात अन्य मजूरांसोबत सोनू ज्ञानेश्वर चव्हाण ही १६ वर्षीय मुलगी देखील गेली होती. सोयाबिनच्या पिकात निंदणाचे काम करित असताना तीला अचानकपणे सापाने चावा घेतला; मात्र वेळेवर उपचार न मिळाल्याने तीचा मृत्यू झाला. सोनू चव्हाण हिचे वडिल ज्ञानेश्वर चव्हाण हे दिव्यांग असून मुलीचा असा आकस्मिक मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटूंबियासह गावकºयांमध्येही शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे शेतकरी व शेतमजूरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.